मेंदूच्या जडणघडणीसाठी

 शिक्षण : शाळा ते करिअर 

भाग विसावा


पालक शिक्षक आणि सर्वांसाठी


मेंदूच्या जडणघडणीसाठीमित्रांनो गेल्या भागात आपण म्हणजे काही पाहिलं मेंदूच्या वाढीसाठी लागणारे पोषक अन्नपदार्थ ,ऑक्सीजन ,ग्लुकोज ,पाणी ,पुरेशी झोप, आनंदी आणि सकारात्मक भावना या गोष्टींनी मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी प्रयत्न करता येतील हे पाहिलं.

 आजच्या भागामध्ये मेंदूचे जडणघडणीसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे सुरक्षित आणि प्रेम मित्रांनो लहान मुलांना मोठी माणसं शिक्षा, अनेकदा क्रूर शिक्षा देतात. मोठ्या माणसांना वाटतं, लहान मुल आहेत , हे कसलं प्रतिकार करणार, ते काय लक्षात ठेवणार .पण सातत्याने वाईट शिक्षा करत राहणं ,मुलांचा अपमान होईल  असं बोलत राहणं तू मला नको आहे असं म्हणन ,या वाक्यांचा मुलांवरती अतिशय त्रासदायक परिणाम होतो. हे वाक्य वारंवार ऐकली तर मुलांच्या मेंदूमध्ये घातक रसायन निर्माण होतात .हे रसायन नकारात्मकता निर्माण करत असतात .

 न्यूरॉनसच्या निर्मितीत यामुळेच अडथळा तर येतोच यापेक्षा महत्त्वाचं की तयार झालेल्या सिनॅप्समध्ये बाधा येते.

 मित्रांनो शिकणे म्हणजे न्यूरॉन्सची निर्मिती होणे आणि ते दृढ होणे. यासाठी आपल्या मेंदूला लागतं आनंदाच रसायन.

 शिकण्याच्या वेळेस दुःख ,अपमान ,ताणतणाव अशा भावना जर असतील तर शिक्षणाची प्रक्रिया त्रासाचे होणार हे नक्की. आपल्याला सकारात्मक परिस्थिती निर्माण झालेले सिनॅप्स हवेत. मुलांना प्रेम हवं असतं. आई-बाबांनी मुलांना जवळ घेणे ,स्पर्श करण, प्रेमानं समजावून सांगणं याला दुसरा कोणताच पर्याय नाही.

 अशा वेळी त्याच्या मेंदूचे रासायनिक बदल घडतात ते सकारात्मक असतात .या घटनेच्या चांगल्या स्मृती निर्माण होतात आणि म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना मार नको ,प्रेम करा.


 नवीन आव्हान


 मित्रांनो कंटाळवाण्या वातावरणात कसलं आव्हान असतं ???
आणि ज्यात आव्हान नाही तिथे कंटाळा येणारच .मुलांना कंटाळा आला तर ते एक मिनिटं थांबू शकत नाहीत .वडीलांच्या मागे लागून आपली सुटका करून घेतात .

म्हणजेच बघा अभ्यासात तोच तोच लिखाणपणा ,वाचन ,पाठांतर .
मित्रांनो सर्व पालकांचा गोड गैरसमज आहे की मुलगा खूप लिहितोय, प्रश्न उत्तर पाठ करतोय ,पाढे पाठ करतोय म्हणजे माझा मुलगा अभ्यास करतोय किंवा खूप हुशार आहे. असं काहीही नसतं.

 याउलट एखादी नवी गोष्ट शिकायची असेल तर लहान मुलेही अतिशय उत्साहाने आणि पटकन शिकतात.

मोठ्यांच्या मेंदूला त्यासाठी जास्त वेळ लागतो तसेच सरावही जास्त लागतो . मोबाईल मोठ्यांना हाताळता येत नाही परंतु लहान मुले अतिशय पटकन मोबाईल हाताळतात ,हे प्रत्येक घरातला उदाहरण आहे.

 मोठी माणसं आज शिकलेल्या बऱ्याच गोष्टी उद्या विसरून जाण्याची शक्यता असते, मात्र जर संपूर्ण लक्ष देऊन ठरवून मेहनत केली तर ते शिकून घेऊ शकतात कारण पेशी निर्मितीचा वेग मंदावला असला तरी पेशींना सतत चालना ही लागतेच आणि म्हणून  प्रौढ मेंदूही आव्हानांच्या शोधात असतात .


मित्रांनो लहान वयातच न्यूरॉन्स आणि न ॲप्स जोडणीचा वेग प्रचंड असतो. जसजसं वय वाढतं तसं मेंदूतील पेशीचा वाढण्याचा वेग कमी होतो आणि म्हणूनच लहान वयात मेंदूला आव्हानात्मक काम देत गेलं तर तो सतत तरतरीत राहतो.


वरिल लिंकला ट्च करा . खरेदी करा मुलांसाठी फ्लॅश कार्ड. प्रत्येक मूल हे निसर्गतः वेगळा आहे आणि ते सतत वेगवेगळे आव्हाने शोधत असतं कारण त्यांना सतत  शिकत राहणं राहायला आवडतं .मेंदूचे मागणी पूर्ण करण्याच्या कामात ते सततच असतात. आपली मुलं अभ्यासाला बसा असं सतत सांगावे लागते, अभ्यास करायला कायमच कंटाळा करतात, याचं कारण मुलांना तोचतोचपणा नको असतो. त्यांना नव्या नव्या आव्हानांना भेटायला आवडतं पण त्यांच्या आयुष्यात आव्हान असतं तरी कुठं ?


बघा पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवत ,प्रश्नांची उत्तर पाठ करायचे ,पाठ केलेलं पुन्हा वहीत उतरून काढायचं ,पुन्हा परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये मुलांना कोणती आम्हाला मिळतात याचा आपण कधी विचार केलाय .

अभ्यासाचा विषय एकदा समजून घेणे म्हणजे नवा विषय आत्मसात करणं यात मेंदूला आव्हान मिळत .त्याचं पुन्हा पुन्हा सादरीकरण करण्यातून नवी पेशी निर्मिती होत नाही .अभ्यास अधिकाधिक पक्का होण्याचे काम यातून काही प्रमाणात होतं ,पण पुढे त्याचा चांगलाच कंटाळा येतो .मुलांकडून याच प्रकारच्या अपेक्षा सातत्याने केल्या जातात आणि म्हणून ती कंटाळतात .


मित्रांनो आपल्या मुलालाही अभ्यास करायचा कंटाळा येतो ना याचं कारण समजलं म्हणून अभ्यास हा आव्हानाशी, वेगवेगळे उपक्रमांशी, जोडला गेला तर त्यांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल. मग हे उपक्रम अवघड असले तरी त्यात त्यांना आनंदच मिळेल.

 मित्रांनो आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती ही मुलांना सतत आव्हान देऊन मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करते.


वरिल लिंकला ट्च करा . खरेदी करा मुलांसाठी मेंदुला खुराक देणारे खेळ 


 मुलांनी खेळलं पाहिजे


 कोणत्याही वयामध्ये खेळ आणि व्यायामाची कमतरता असेल तर ते मेंदूसाठी निश्चितच घातक आहे .डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम भाग असतो . जेवढी मुले खेळतील तसा कॉर्पस सक्षम होतो. म्हणून मुलांसाठी खेळ, हालचाल  व्यायाम महत्त्वाचा आहे .मेंदू सशक्त आणि तरतरीत ठेवायचा असेल तर मुलांनी खेळायला हवं. विविध प्रकारचे व्यायाम करायलाच हवेत .त्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो पेशींना ऑक्सिजन मिळतो. विविध मैदानी खेळ व्यायाम याचबरोबर त्याला नृत्याची जोड देता यायला पाहिजे .

मित्रांनो एका अभ्यासावरून असे दिसून येते की एका गटातील मुलांना पारंपरिक पद्धतीने शिकवले आणि दुसऱ्या गटाला या शिकवण्याच्या जोडीला नृत्यातही सहभागी करून घेतलं. जी मुलं नृत्यात सहभागी होती त्या मुलांच्या विविध क्षमतांमध्ये वाढ झालेली दिसून आली .उदाहरणार्थ विविध दिशांनी विचार करण्याची क्षमता ,कल्पनाशक्ती ,समस्या सोडवण्याची क्षमता अशा अनेक क्षमता वाढल्या .यामुळे लयबद्ध हालचालींना संगीताची तालाची मदत झाली.  यामुळे मेंदूच्या विविध क्षमता वाढतात हे सिद्ध झालं .आपलं मन मेंदू आणि शरीर हे एकच असतं या घटकांची एकात्मता जर असेल तर त्याचा चांगला परिणाम होणारच आणि म्हणूनच मुलांचा नेहमी ओढा खेळाकडे जास्त असतो अभ्यासाकडे कमी असतो याचं कारण हेच असतं आणि मित्रांनो खेळ सुद्धा तेच तेच असतील तर मुलं खेळत नाहीत उलट ती नवीन खेळ शिकण्यासाठी उत्सुक असतात आणि म्हणूनच आपण मुलांना खेळू द्या व त्याचबरोबर खेळातून शिक्षण कसे घडेल याकडे सुद्धा आपले लक्ष असाव.

CLICK here to buy outdoor games for our children.


ताणतणाव


  मुलांच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण तणाव असता कामा नये. काही प्रमाणात मनावर ताण असेल तर हातून चांगले काम घडतं पण जेव्हा त्यात कसली तरी चिंता वाटायला लागते तेव्हा ताण तणाव वाढतात. मन नकारात्मक विचारांकडे झेपते.

 एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली आपली जीभ कोरडी पडते ,छातीत धडधडतं,  झोपेवर परिणाम होतो ,अस्वस्थता वाढते, पाय जड होतात , हातांचे चाळे चालू होतात, पोटात गोळा उठतो.
म्हणजेच ताणाचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.

 मित्रांनो आपल्या मुलांच्या बाबतीतही असंच घडतं . आपण त्यांना रागावतो ,ओरडतो ,अभ्यासाला बस आता अभ्यास कर, माझ्यासमोर अभ्यास कर या सततच्या मुलांच्या मनावरती येणार्‍या ताणामुळे मुलांची परिस्थिती अशीच होते. त्यांच्या शरीरावर त्याचबरोबर मेंदूवरही घातक परिणाम होतो आणि मुलं नकारात्मक वातावरणात वळतात .
तणावाच्या वेळेस काही व्यक्ती येरझारा घालतात असे आपण पाहिले असेल तर त्याची तीव्रता कमी करण्याचा एक सोपा उपाय आहे .कारण त्यामुळे शरीराची हालचाल वाढते आणि रक्ताभिसरण वाढतं .  ताण हलका होतो.   ताण आलाच तर त्याचा योग्य पद्धतीने निचरा ही झाला पाहिजे.


मेंदू आपली शेकडो कामं बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तर आपल्याला या अवयवांची जाण होते. इतका दुर्लक्षित असतो .आपला चेहरा पेहराव त्यांची जेवढी आपण काळजी घेतो त्यापेक्षा मेंदूची अधिक काळजी घ्यायला हवी .मेंदूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या व न आवडणाऱ्या गोष्टी टाळल्या तर तो कायम तत्पर राहणार आहे. मात्र रोजच्या जगण्यात वागण्यामध्ये आपण काही गोष्टी पूर्णता टाळू शकत नाही अशा वेळेस त्या कमी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करता येईल.

क्रमशः

 सचिन बाजीराव माने 

आरफळ सातारा

 sachinmane0383@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
होय बालमन कार्बन पेपर सारखे असते . टिपकागद आमचा लहानपणीचा शब्द हलकासा दाब सुद्धा टिपणारा . सकारात्मक आनंदी मन हे या टिपकागदासारखं असत . ग्रहणकरण्याचा वेग प्रचंड असतो .
बालमन आनंदी असेल तर ते कमी वेळात जास्त आत्मसात करते . पण तेच आनंदी नसेल तर त्याचा शिकण्याचा वेग मंदावतो .
खुप छान