बुद्धी म्हणजे काय रे भावड्या ?

शिक्षण : शाळा ते करिअर 

 

भाग एकविसावा 

 

पालक शिक्षक आणि सर्वांसाठी 

 यंदाचं वर्ष हे पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. यावर्षी पु.ल.शी निगडीत अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. गंधार संगोराम या पुण्याच्या पु.ल.प्रेमी आणि संगीतकाराने पु.लं.ना मानवंदना देण्यासाठी पु.लंच्या हस्ताक्षराचा फॉण्ट तयार केला आह.याच फॉंटमध्ये हा लेख.

हा लेख पु.ल.ना समर्पित .

 

बुद्धी म्हणजे काय रे भावड्या ?

 

             गेल्या भागात आपण वाचले मेंदू म्हणजे काय ?मेंदूत काय असतं ?

 

 

मग मेंदू म्हणजे बुद्धी का ?

 

बुद्धी कुठे असते ?

 

मेंदूतल्या कुठल्या भागामुळे माणसाला बुद्धी प्राप्त होते ?

 

बुद्धीही एकाच प्रकारची असते का अनेक प्रकारची ?

 

ती मेंदूच्या एकाच भागावरून ठरते का सगळीकडे पसरलेली असते ?

 

ती फक्त गणित आणि विज्ञान अशा गोष्टींमध्ये दिसून येते का चित्रकला, संगीत, साहित्य ,नृत्य अशा कलांमध्ये दिसून येते?

 

 ज्याला खूप माहिती आहे त्याला पण हुशार समजावं की ज्याच्या मध्ये खूप शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा आहे त्याला हुशार समजावे?

 

 अशा तऱ्हेतऱ्हेच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत?

 

 

 

 बुद्धी म्हणजे नेमकं काय ?

 

 

 

मित्रांनो बुद्धी म्हणजे बुध्यांक चाचणी नाही .

 

बुद्धी ही स्वतः मध्ये  आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदल करून परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता.

 

 या दोन्ही गोष्टी बुद्धी या संकल्पनेत येतात .

 

बुद्धी किंवा क्षमता या अनुवंशिक असतात 

 

त्याचबरोबर सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे प्राप्त हि करता येतात

 

                    आपल्या मेंदूतल्या निर्णयांची सर्किट्स ही वयाप्रमाणे उलगडत जाणाऱ्या जीन्सच्या प्रोग्रामप्रमाणे आणि तसेच बाहेरच्या वातावरणामुळे अनुभवांमुळे बदलू शकतात णूनच आपला मेंदू हा अॅडॅप्टिव्ह  किंवा प्लास्टिक आहे अस आपण म्हणतो.  आपली बुद्धी सुद्धा काही प्रयत्नांनी वाढू शकते काका ती फक्त अनुवंशिक असते आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी ती बदलत नाही असं असतं का ?

 

               मित्रांनो बुद्धी ही बरीचशी अनुवंशिक असली तरी ती प्रयत्नांनी आणि परिस्थितीप्रमाणे वाढवू शकते .फक्त ही वाढ फारच होत नाही ,त्याला काही मर्यादा पडतात. म्हणजेच आपला मोबाईल किती जीबीचा आहे यानुसार त्याचा प्रोसेसर काम करतो. जर आपल्या मोबाईल मध्ये साठवणूक क्षमता म्हणजे जीबी  कमी असेल तर आपला मोबाईल काही दिवसांनी हँग होतो .म्हणजेच त्याची साठवण क्षमता जेवढी जास्त तेवढं तो जास्त वेगाने काम करतो.

 

                 तसंच अगदी तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूची वाढ ही मूल गर्भात असल्यापासूनच होत असते .त्याचा वाढीचा वेग हा आईच्या गर्भात प्रचंड असतो म्हणजे 80% आणि त्यानंतर एक वर्षापर्यंत 15% असा वाढीचा वेग होतो.

 

                            मित्रांनो माणसाच्या मेंदूवर वळकट्या असतात .हा वळकट्याने बनलेला मोठ्या मेंदूचा बाहेरच्या आवरणाचा भाग म्हणजेच कॉर्टेक्स. इतर अनेक प्राण्यात हा अशाप्रकारे दिसत नाही. या कॉर्टेक्स मुळेच माणसाला बुद्धी मिळते. माणसाचा कॉर्टेक्स सरासरी दोन मिलिमीटर जाडीचा असतो. या कॉर्टेक्सचे सहा थर असतात .या प्रत्येक थरातल्या मज्जापेशी आकाराने वेगवेगळ्या असतात. इतर प्राण्यांना कॉर्टेक्स नसतो असं नाही. पण माणसासारख्या खूप वळकट्या नसतात.

 



                       माणसाच्या कॉर्टेक्स वरच्या वळकट्या काढून टाकल्या आणि तो एका मोठ्या कापडासारखा अंथरून ठेवला तर त्याचा आकार A4 आकाराच्या कागदाच्या चौपट एवढा होईल. इतर प्राण्यांचे बघितलं तर चिंपांजीच्या बाबतीत असंच केलं तर हा आकार फक्त एकाच A4 कागदाएवढा होईल तर इतर माकडांच्या बाबतीत हा आकार पोस्टकार्ड एवढा तर उंदराच्या बाबतीत हाच आकार पोस्टाच्या तिकिटाएव्हडा होईल .

 

                     बुद्धी जेवढी  जास्त तेवढे या आवरणातल्या मज्जापेशी जास्त. पण या सगळ्या मज्जापेशी माणसाच्या त्या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या आवरणावर मावत नाहीत म्हणूनच या सुरकुत्या किंवा वळकट्या पडल्या असाव्यात असा तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणूनच जेवढे वळकट्या जास्त तेवढी बुद्धी जास्त असंही मानलं जातं .कॉर्टेक्स मधल्या या पेशी राखी रंगाच्या दिसतात.

 

 

                  मित्रांनो बुद्धी अनुवंशिक असते किंवा नंतर ती प्रयत्नांनी परिस्थिती प्रमाणे आपण वाढवू शकतो. यासाठी आपल्याला हवे सकारात्मक प्रेरणा. मूल आईच्या पोटात असताना सहा महिन्यांपर्यंत मेंदूवर वळकट्या नसतात. साडे सहा महिन्यांपासून ते दहा  महिन्यांपर्यंत या वळकट्या पडत राहतात .जन्माच्या वेळेपर्यंत मेंदूचा 80 टक्के भाग विकसित झालेला असतो .काही माणसांचा मोठा झाल्यावरही मेंदू गुळगुळीत राहतो .त्यांना कुठलेच गुंतागुंतीची गोष्ट करता येत नाही .

 

                    मेंदूचा आकार मोठा असला तर बुद्धी जास्त असतं असं मानलं जातं ,पण चाचणी घेतल्यावर तसे आढळले नाही. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त हुशार असतात अशी समजूत होती पण तीही चाचणीमध्ये खरे ठरले नाही .मेंदूतल्या राखी रंगाचा जो भाग असतो त्याचा पांढऱ्या भागाशी रेशो असतो त्याचा बुद्धीशी संबंध आहे .मेंदू मधला राखी रंगाचा भाग जितका जास्त तितका बुद्ध्यांक जास्त .एखाद्याचा बुध्यांक वयाप्रमाणे बदलतो की आयुष्यभर तसाच राहतो याविषयी संशोधकांनी चाचण्या घेतल्या यामध्ये वयाबरोबर बुद्धी चक्क सुधारत होती असा आढळला. त्याचबरोबर जी माणसं लठ्ठ जाड त्यांचा बुद्ध्यांक कमी असं कळलं.

 

 

                 मित्रांनो आपल्या आयुष्यात खूप वेगळ्या गोष्टी केल्या तर आपला मेंदू तल्लख होतो. म्हणजेच आपल्या मुलांच्या बाबतीत मुलांचे शिकणे घडत असताना ज्ञानरचनावाद पद्धतीने जर मुलांचे शिक्षण घडलं तर मुलं स्वतःच्या स्वतःला आव्हान घेत शिकत राहतील आणि त्यांना सतत सकारात्मक प्रेरणा दिली तर मुलांची बुद्धी नक्कीच विकसित होते आणि म्हणून मुलांना सतत नवीन आव्हान वेगवेगळ्या गोष्टी करायला दिल्या तर मुलांचा बौध्दीक विकास होईल .

 

मित्रांनो मेंदूवरील वळकट्या म्हणजेच मोबाईल मधील मेमरी जशी आपल्याला वाढवता येत नाही परंतु निसर्गत आहात माणसाच्या मेंदू वरील वळकट्या म्हणजे जे माणसाने प्रयत्न करून वाढवलेली बुद्धी असते म्हणजेच आपण नेहमी वाचतो मेंदूमध्ये अनेक न्यूरॉन्स असतात आणि न्यूरॉन्स  जोडण्याचे काम सिनॅप्स करतात .आपण घेतलेले अनुभव केलेल्या कृती यांनी त्यांची जोडणी होते आणि या जोडणीला सिनॅप्स म्हणतो .जेवढे जास्त सिनॅप्स वाढतील तेवढी बुद्धी वाढेल आणि वाढलेली बुद्धी वळकट्याच्या रूपात मेंदूवर असते.

 

 

 

                  मित्रांनो  काहींची बुद्धी ही अनुवंशिक असते तर काहींनी प्रयत्नांनी मिळवलेली असते .मित्रांनो सहज आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिले किंवा आपण सतत असाच विचार करत असतो ,की डॉक्टर च्या घरात जन्माला आलेला मुलगा डॉक्टर होतो किंवा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो. मलाही असेच प्रश्न पडलेले होते. पण आता काही प्रमाणात ते मात्र आता संशोधकांनी संशोधन केल्याप्रमाणे काहींचे बुद्धिमत्ता बुद्धी हे अनुवंशिक असते हे या उदाहरणांवरून समजते.

 

 

 मात्र अतिशय रंजक गोष्ट आपण वाचणार आहे  वाचून आपण नक्कीच सुन्न व्हाल 

 

 

ऊसाच्या पाचटीच्या झोपडीत आईच्या पोटात असतानाच वडील वारले आणि जन्म झाल्यानंतर वडील दिसायला कसे होते याचा फोटो काढायला पैसे नसल्याने माझी आई.

 

 मला जगवायच आणि स्वत; जगायचं कसं / याच विचारात असताना ,आमच्या तांड्यावर आईने मोहाची दारू विकायचं उद्योग सुरू केला .येणारे जाणारे लोक घरी यायचे आणि ती त्यांना दारू विकायची.

 मी मोठ्याने रडायचो, दुधाच्या आशेने पण आई माझ्या तोंडात दारूची चार थेंब टाकायची .कारण पोराच्या रडण्याने येणारे गिराईक जाईल म्हणून. मोठा झालो, येणारे-जाणारे गिर्हाईकांना शेंगा फुटाणे विकायचे.

 

 

 पण मला शाळेत टाकलं .अभ्यास करू लागलो. अभ्यास करता करता   गिर्हाईक मला म्हणालेे , ' दारू आण'  .पण मी 'नाही ' म्हटलं. म्हणाला," शिकून काय डॉक्टर ,इंजिनिअर होणार आहेस का ?"

 

एकच वाक्य मनाला चटका देऊन गेलं आणि त्याच वेळी ठरवलं की मलाही डॉक्टर होता येईल. झपाटून अभ्यासाला लागलो. खूप अभ्यास केला. आश्रम शाळेत शिकलो, आई पासून 150 किलोमीटर लांब .माझी आई तर खूप रडली पण मी शिकायचं ठरवलं होतं .बारावीला 94 टक्के पडले .मुंबईत डॉक्टरच्या शिक्षणासाठी प्रवेश  मिळाला .

 

 

शिक्षण सुरु असतानाच युपीएससीची परीक्षा दिली आणि डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला माझा निकाल हाती लागला .मी आयएएस परीक्षा पास झालो, कलेक्टर झालो. पण माझ्या आईला काहीच कळत नव्हतं. तिला माहित होते की माझा मुलगा डॉक्टर झालाय, पण मी आईला सांगितलं की मी डॉक्टरकी सोडून देऊन कलेक्टर झालोय .

 

सगळे लोक नेतेमंडळी माझं स्वागत करायला घरी यायची पण आमच्या तांड्यावरची लोक म्हणायचे ,हा पोरगा कंडक्टर झालाय ,लय मोठा साहेब झालाय.

 

 मित्रांनो हे सगळं घडलं ते माझ्या प्रेरणेने स्वयंप्रेरणेने अभ्यासाने जिद्दीने चिकाटीने मिळवु शकलो




 मित्रांनो मी भिल्ल समाजातील पहिली व्यक्ती  डॉ. राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार .


डॉ. राजेंद्र भारूड यांनी लिहिलेले  ' मी एक स्वप्न पाहिलं हे पुस्तक नक्की वाचा.

 

 

                मित्रांनो माझे पडलेले दोन प्रश्न हेच होते की

 

 डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो कसा होतो आणि त्याच्या विरुद्ध आपण नेहमी बातम्यांमध्ये वाचतो ऐकतो पाहतो चहा विकणाऱ्याचा मुलगा C.A. झाला आहे .एका भांडी  घासणारनिची  मुलगी पीएसआय झाली, हे कसं काय ???

 

 

 

तसाच दारू विकणाऱ्या बाईचा मुलगाही कलेक्टर होतो हे कसं काय या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतीलच.


वरील लिंकला टच करा आणि एमपीएससी ची सर्व पुस्तके खरेदी करा डिस्काउंट मध्ये

वरील लिंक ला टच करा आणि यूपीएससी ची सर्व पुस्तके खरेदी करा डिस्काउंट मध्ये




               
बुद्धी अनुवंशिकतेने मिळते. त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती ,सकारात्मक प्रयत्न ,नवीन आव्हाने स्वीकारण्याची क्षमता याच्या जोरावर ती वाढवता येते.

 

  मुलांची बुद्धी वाढवायचे असेल तर आपल्या मुलांना सकारात्मक प्रेरणा नवीन आव्हाने कृती दिली पाहिजेत तुम्ही म्हणाल हे सारखेच म्हणतात सकारात्मकप्रेरणा द्या,आव्हाने द्या.पण आव्हान  घ्यायची कशी???

 

 मित्रांनो छोट्या-छोट्या कृतींतून ही आपल्याला मुलांना आव्हान देता येतील

 

आपण आपल्या आयुष्यात सतत बदल करत राहिला पाहिजे 

 

अगदी काही छोट्या गोष्टी केल्या तरीही

 

 मधून मधून उलट्या हाताने ब्रश करा.

 डोळे बंद करून चहा करणे

 किंवा एखादा परिछेद  उलटा वाचन  करा 

 आपण जरी अगदी जीनियस होत नसला तरी त्याचा मेंदूला फायदा नक्कीच होतो.

 

 

 मित्रांनो याच बरोबर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धीवर संगीताचा परिणाम नक्कीच होतो 


Click here to buy all type music CD 




                   मित्रांनो  हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल आहे ,1997 साली शॉ आणि डॉ रॉशर यांनी मुलाची बुद्धि पियानो ऐकल्यामुळे वाढते हे आम्ही सिद्ध केल्यास जाहीर केलं .त्यांना संगीताचे हे बुद्धिवर्धक धडे मिळाले होते. त्यांच्या बुद्धीत इतरांपेक्षा 34 टक्क्यांनी वाढ झालेली त्यांना आढळले आहे .त्यांनी उद्योगच सुरू केला .त्यांनी म्युझिक इंटेलिजन्स न्युरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाची संस्थाही काढली .त्यांनी त्यावर Keeping Mozart in mind ' नावाचे एक पुस्तक लिहिलं. त्याची सीडी तयार केली आणि हे सगळं 52. 95 डॉलर्सला म्हणजेच दोन हजार पाचशे रुपयाला विकायला सुरुवात केली आणि जॉर्जिया राज्यातले राज्यपाल या प्रकाराने इतके भारावून गेले किती ते जन्माला आलेल्या प्रत्येक अर्भकाला मिळावी यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले .


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी वरील लिंकला टच करा



एकूणच काय तर आपल्या बुद्धीचा मेंदूशी ,आजूबाजूच्या वातावरणात सतत खाद्य मिळण्याची ,संगीताशी आणि इतर आणि गोष्टींशी जवळचा संबंध आहे हे नक्की.


Click here to buy music cubes for kids 



 तेव्हा मित्रांनो आपल्या मेंदूला खायला द्या ,आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक प्रेरणा निर्माण होईल असा प्रयत्न करा, त्याच बरोबर अभ्यासा वेळी घरामध्ये शांत संगीत लावा, मुलांना आनंदी प्रेरणा द्या .

वरील लिंक ला टच करा आणि आपल्या मुलांच्या वयानुसार त्यांना खेळातून शिक्षण मिळेल आणि त्यांच्या मेंदूचा विकास होईल असे ऍक्टिव्हिटी किट खरेदी करा.


वरील लिंकला टच करा आणि
विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेले ' मन मे है विश्वास '  पुस्तक खरेदी करा.





क्रमश :

 सचिन बाजीराव माने 

आरफळ सातारा


टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
मी तर म्हणेन जो जिद्दीचा तोच बुद्धीचा
Yes
I like
YES ! I CAN !!! म्हणाले…
खुपच छान टॅगलाईन दिली.
जो जिद्दीचा तो बुद्धिचा .
रविंद्र लटिंगे म्हणाले…
सर, खूपच छान शब्दात वर्णन केले आहे...समर्पक शब्दात विवेचन... नवीन माहिती मिळाली...
Devdas Gaikwad म्हणाले…
खूपच छान संकलन