शिक्षण : शाळा ते करिअर
भाग बाविसावा
पालक शिक्षकांनी सर्वांसाठी
अक्कल( कॉमन सेन्स ) आहे का ?
मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात आपण एका गोष्टीपासून करणार आहोत ही गोष्ट आहे आपलंच शिकलेल्या पाठ्यपुस्तकातील गोष्ट .......वाचताना आपल्याला या धड्याचे नाव आठवेल.
ती गोष्ट अशी होती............. बाळूला मामा पैसे देतात .बाळू पैसे घेऊन घरी येताना त्याच्या हातातून वाटेत कुठेतरी पडतात. " ते खिशात असे नीट ठेवायचे ना." आई बाळूला म्हणते.
पुढच्या वेळी आई दूध आणायला सांगते .बाळू दुधाचा तांब्या खिशात ओततो आणि घरी येतो .आई म्हणते," अरे तांब्या डोक्यावर ठेवून आणायचा ना . "
पुढच्यावेळी मामा त्याच्याकडे लोण्याचा गोळा देतात .बाळू लोण्याचा गोळा डोक्यावर ठेवतो आणि घरी येतो आणि सगळे लोणी वितळून चेहऱ्यावरून ओघळत असते. " ते लोणी केळीच्या पानात गुंडाळून आणायचे ना ." आई म्हणते
पुढच्यावेळी मामा एक छानस कुत्र्याच पिल्लू देतात .
बाळू कुत्र्याच्या पिल्लाला केळीच्या पानात करकचून बांधून आणतो .आई म्हणते ," अरे पिलाला खांद्यावरून आणायचे ना ."
पुढच्या वेळेला गाढवा आणायचे असते तेव्हा गाढवाला खांद्यावरून आणण्याचा प्रयत्न करतो .त्याच्या आणि गाढवाच्या मागे गावातली सगळी पोरं गंमत बघत पळत असतात.
पुढे काय घडते आपल्याला माहीतच आहे.
ही गोष्ट आहे सांगकाम्या बाळुची .
परंतु मित्रांनो आपण दररोज जगत असताना बऱ्याच गोष्टी अशाच करतो आणि मग आयुष्यभरासाठी आपलं वाक्य आपल्या मुलांसाठी हेच असतं .
तुला काय अक्कल आहे का ?
डोकं गहाण ठेवलं का ?
प्रत्येक गोष्टीत आपण दुसऱ्याच्या अक्कल काढतो परंतु मित्रांनो खरच अक्कल म्हणजे काय ?
घरात आपण मुलांच्या अक्कल काढतो ??
शाळेत गेल्यानंतर शिक्षक मुलांच्या अक्कल काढतात लहानपणी आई-वडील.... शाळेत गेल्यावर शिक्षक ...कामावर गेल्यावर बॉस .......लग्न झाल्यावर बायको ............म्हातार झाल्यावर मुलं....... एकमेकांच्या मेकांच्या अक्कल काढण्यात व्यस्त असतात .
आपण सारासार विचार न करता कोणतीही गोष्ट केली नाही तर समोरची व्यक्ती पटकन आपल्याला ," तुला काय अक्कल आहे का नाही " हे वाक्य दिवसातून कमीत कमी शंभर वेळा तरी आपण बोलतो .
मित्रांनो आपले पाच मित्र म्हणजे आपली ज्ञानेन्द्रिये .आपल्या पाच मित्रांनी घेतलेल्या माहितीच मेंदू नावाचा राजा विविध भागांमध्ये नोंदीचे काम सुरु करतो .मेंदू अतिशय अफाट वेगानं डॉक्युमेंटेशन काम करतो .डोळे कान नाक जीभ त्वचा या आपल्या पाच मित्रांनी माहिती आणून दिल्यानंतर त्या त्या क्षेत्रातले विविध भाग उद्दीपित होतात .न्यूरॉन ही पेशी या कामात अहोरात्र लागलेली असते .अब्जावधी न्यूरॉन्स माहिती घेण्यासाठी तत्पर असतात. त्यांना ग्लिया पेशी मदत करत असतात .
मेंदूकडे जेव्हा एखादी नवीन माहिती येते तेव्हा विद्युत रासायनिक प्रक्रिया घडते . जाला माहिती मिळालेली आहे असा न्यूरॉन की माहिती घेऊन दुसऱ्या पेशी कडे जातो दुसरी ग्राहक पेशी ची माहिती घेते त्यावेळेला त्यांच्यात बंध निर्माण होतो .हा बंध म्हणजेच सिनॅप्स तयार झाला. म्हणजे शिकण्याची प्रक्रिया घडते.
न्युरॉन कडून दुसऱ्या न्युरॉनकडे विद्युत रासायनिक संदेशांची देवाणघेवाण चालू असते. घरात एखादं कार्य चालू असेल तर ज्याप्रमाणे कामांची गडबड सुरू असते तशीच गडबड इथे सुरू असते. प्रत्येक न्युरॉनचे आपले क्षेत्र ठरवलेले काम करत असतात.
मित्रांनो आपल्या मेंदूत काही असच घडत असतं आणि म्हणून जेव्हा आपण डोळ्यांनी पाहतो, ऐकतो , त्वचेने स्पर्श समजतो, नाकाने गंध घेतो ,जिभेद्व्यारे चव कळते अशा 5 मित्रांनी घेतलेली माहितीचे व्यवस्थित आकलन न झाल्याने व योग्य कृती न घड्ल्यामुळे ....अक्कल आहे का ......डोक आहे का अशा कॉम्प्लिमेंट्स मिळतात आणि हे सर्वांच्या बाबतीत घडतं .
अभ्यासात अतिशय हुशार असलेली स्नेहा ती पाचवीत शिकते पण रस्त्यापलीकडे उभ्या असलेल्या शाळेच्या बस पर्यंत आणि बस पासून घरापर्यंत यायला तिला आई किंवा दादा लागतो रस्ता क्रॉस करण्याची तिला तिची भीती वाटते. प्रदीपचे गणित एकदम पक्क पण दुकानात काही वस्तू आणायला पाठवलं तर हमखास पैशांचा घोळ करणार .राजेश एकटा असताना छान वागतो पण चारचौघात गेला की गोंधळलेला असतो. अंकित खेळत असताना मित्र-मैत्रिणींशी त्याला डिल करता येत नाही .मला कोणी खेळायला घेत नाही .माझ्याशी सगळे असेच वागतात अशी तक्रार करतो .
यात मुलांचा दोष पालकांचा व शिक्षकांचा ??? मुलं सुद्धा काही प्रसंगी मठ्ठा सारखी गोंधळल्यासारखे बुजल्यासारखी वागतात. या सर्वांचे कारण म्हणजे तो विशिष्ट प्रसंग हाताळणे, त्या प्रसंगात तगून राहण्याचा त्यांच ज्ञान अर्थात व्यवहार ज्ञान कमी पडतं. आपल्याकडे सर्व विषयांचे शिक्षण मिळण्याची सोय आहे. त्यामध्ये अभ्यासाचे विषय, इंग्लिश हस्ताक्षर सुधारणे, वर्ग चालतात ,परंतु रोजच्या जीवनामध्ये कसं जगायचं ज्ञान देणारी शाळा उघड्ली नाही किंवा शिक्षण कुठे दिले जात नाही .
घरामध्ये मुलगा आला आणि त्याच्याकडून कोणतीही गोष्ट करताना चूक झाली तर वडील किंवा लगेच म्हणतात तुझ्या शिक्षकांनी हेच शिकवले का किंवा शाळेत मुलगा गेला तर शाळेमध्ये मुलांकडून एखादी चूक झाली किंवा विसरला तर शिक्षक म्हणतात आई-वडिलांनी हेच शिकवले का? मग सांगा मुलांना नक्की काही कळत नाही की माझ चुकलयंं का ,नक्की शिक्षकांच चुकतंय का ,नक्की पालकांचे चुकतंय आणि या गोंधळामध्ये त्यांचं शिकायचं राहून जातं आणि म्हणून व्यवहारज्ञान शिकवण्यासाठी कुठेही वर्ग चालत नाहीत .
कोणीही व्यवहारज्ञान कसं शिकायचं हे शिकवलं जात नाही . व्यवहारज्ञान शिकण्याची संधी प्रत्येकाला ती घ्यायला हवी आणि लहान मुलांना ती कशी पावलो पावली मिळेल याची काळजी पालकांनी घ्यायला हवी पण व्यवहार ज्ञान मिळवायचं कसं शिकण्याची संधी मुलांना द्यायची कशी आणि म्हणूनच प्रत्येक वेळी मुलांना अनुभव संपन्न उपक्रम दिले पाहिजेत. या उपक्रमांमधून किंवा या प्रत्येक गोष्टींमधून मुलगा स्वतः माहिती घेऊन त्याची उकल करण्याचे क्षमता मुलांमध्ये निर्माण होईल अशा कृती ,प्रसंग निर्माण करावेत .
गोष्टीमध्ये बाळूला कोणती गोष्ट कशातून वाहुन न्यायची याची जाण नव्हती आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपल्या मध्ये सुद्धा कॉमनसेन्स नसतो अस प्रत्येक जण आपल्याला असेच म्हणतो आणि तुला काय अक्कल आहे का ? तुझ्या डोक्यात काय आहे ? तुझं डोकं का चालत नाही ?
सुशिक्षित भाषेत बोलायचं तर कॉमन सेन्स आहे का? कॉमन सेन्स म्हणजे काय तर विचार करून केलेली कृती जी पाच ज्ञानेंद्रीयांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेली असेल. घरामध्ये मुलगा जर आई-वडिलांची उद्धटपणे बोलत असेल तर आई-वडील म्हणतात शिक्षकांनी तुला हेच शिकवले का आणि शाळेत तक्रार घेऊन गेल्यानंतर शिक्षक म्हणतात आम्ही हे शिकवत नाही मुलांना .आम्ही मुलांना विषय अभ्यास शिकवतो. यावर आपले उत्तर असेल की संस्कार मुलांना दिले गेले नाहीत का.
मित्रांनो व्यवहार ज्ञान ,संस्कार हे कुठे शिकवले जात नाही या. प्रत्येक गोष्टी प्रत्येक जण अनुभवातून शिकत असतो आणि हे अनुभव लहानपणापासून मुलांना जसे येतात तसे मुलांचं घडणं घडतं .मित्रांनो आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे मुलांच्या जन्मा अगोदरपासूनच मुलांचे घडणं सुरू होत असतं .जर मेंदूकडे येणारे संदेश योग्य पद्धतीने आले नाहीत तर व्यवस्थित कृती घडत नाही आणि शिकण्यात अडचणी निर्माण होतात.
काही वैज्ञानिकांच्या मते तर बाळ गर्भात असताना जर अल्कोहोलचे सेवन केले असेल तर मुलांमध्ये दोष उत्पन्न होत असतात आणि म्हणूनच मुल घडवायचं असेल तर जन्मा अगोदरपासूनच आहार, अनुभव ,कृती योग्य पद्धतीने दिल्या तर मुलांचं घडणं अतिशय सुखकर होईल.
आपण उदाहरण पाहिल्याप्रमाणे आजी जीनकोणत्याही शाळेत गेली नाही परंतु ती मुंबईला व्यवस्थित पोहोचू शकते आणि बारावी शिक्षण घेतलेला मुलगा वाचता येत असूनही मुंबईला पोहोचू शकला शकत नाही. यामध्ये एकच कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे अनुभव आणि व्यवहारज्ञान.
मित्रांनो आपल्या दररोज विविध कृतींमध्ये कॉमन सेन्स किंवा व्यवहार ज्ञान नसल्यामुळे किंवा ज्ञानेंद्रियं मार्फत आलेल्या माहितीच्या किंवा सूचना यांचा योग्य वापर न केल्यामुळे घडणाऱ्या मजेदार प्रसंगांचे चित्रीकरण टीव्ही वरती पहात असतो आणि आपणच मोठमोठ्याने हसत असतो. असे चित्र विचित्र कार्यक्रम आपण प्रत्येक वेळी टीव्हीवर पाहतो आणि आपले मनोरंजन होते .
परंतु ' आपण ' इतरांचे मनोरंजन आपल्या कॉमन सेन्सचा वापर न केल्यामुळे किंवा ज्ञानेंद्रियांच्या सूचनांचा नीट अर्थ न लावल्यामुळे होऊ नये
याचा विकास होण्यासाठी ज्ञानेंद्रियांची जास्तीत जास्त ज्ञान विकसित करण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणूनच पूर्व प्राथमिक वर्ग असतील किंवा प्राथमिक शिक्षण असेल यामध्ये ज्ञानेंद्रियांच्या विकासावर ती खूप भर दिलेला असतो .आत्ताच्या शिक्षणपद्धती पाहिली तर या शिक्षण पद्धतीमध्ये ही ज्ञानेंद्रियांच्या विकासावर भर दिलेला आहे.
इयत्ता पहिलीची नवीन शिक्षण पद्धती पाहिली तर त्यामध्ये ही श्रवण भाषण वाचन लेखन या मूलभूत क्रिया बरोबरच रसास्वाद ,ध्वनींची जाण, लिपीची जाण , समजपूर्वक वाचन अर्थपूर्ण लेखन यासाठीच्या कृतींची साखळी दिलेली आहे. त्याच बरोबर आपणास विविध उपक्रम हे घेता येतील.
दिल्लीमध्ये तर ज्ञानेन्द्रिय बाग विकसित केलेली आहे.
त्याचबरोबर ज्ञानेंद्रिय जत्राही आपणास शाळेत भरवता येईल .यामध्ये विविध ज्ञानेंद्रियांचे ज्ञानेंद्रियांचा विकास होण्यासाठी चे खेळ कृती आपणास घेता येतील.
त्याचबरोबर शाळांमध्ये दरमहा एकेक ज्ञानेंद्रिय निवडून त्या ज्ञानेंद्रियं संदर्भातील विविध उपक्रम खेळ कृती घेतल्या जाव्यात .
या माध्यमातून विविध ज्ञानेंद्रियं मार्फत आलेल्या सूचनांचा मेंदू व्यवस्थित ताळमेळ दाखवून कृती करायला भाग पाडेल आणि त्यातून आपणास कोणीही म्हणणार नाही की तुला अक्कल नाही ???
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
sachinmane0383@gmail.com
1 टिप्पण्या
प्रत्यक्ष अनुभव खुप महत्वाचा आहे .