शिक्षा नको आनंद पाहिजे

शिक्षण : शाळा ते करिअर
 भाग  सतरावा 
 पालक शिक्षक आणि सर्वांसाठी
 मुलं फुलताना 

शिक्षा नको आनंद पाहिजे


                        सात वर्षाच्या रुद्रने रागाच्या भरात शाळेतून आल्या आल्या दप्तर फेकून दिलं. त्या वर त्याच्या वडिलांनी ते उचललं आणि आणखीन लांब फेकल. चांगले दोन फटके लगावले आणि त्याच्यावर ओरडले," खरं म्हणजे मी तुला फेकून द्यायला हवं ते मी आता करत नाही तुझं नशीब समज .तुझ्यासारख्या पोराला कशाला मी घरात ठेवले .यामुळे तू शिकणार आहेस का? तुला सगळं मिळतंय म्हणून तुला कशाची किंमत नाही ,आमच्या लहानपणी असं नव्हतं ...आमचा पाय पुस्तकाला लागला तर आम्ही पाया पडायचं आणि तुमच्या पिढीला काहीच कळना झाले ." हे असं बरंच काही दहा मिनिटे चाललेलं होतं.

                             रुद्रला तर कळतच नव्हतं नक्की काय चाललय ते ? दप्तर आपण फेकले ते नक्की बरोबर आहे का चुकीचं ? आपण या घरात आहे याचा या लोकांना वाईट वाटतंय का चांगलं वाटते?  मला सगळं मिळतंय याचा दप्तर   फेकण्याशी काय संबंध आहे ? आमची पिढी म्हणजे काय?  आमच्या लहानपणी असं नव्हतं मग कसं होतं?  मी दप्तर फेकल म्हणून मला मारलं  पण  वडिलांनी दप्तर का अजून लांब फेकलं ? अशा प्रश्नांच्या गोंधळामध्ये हे नक्की चूक काय बरोबर काय हे  मला शेवटपर्यंत समजलं नाही .


                              मित्रांनो मुलांनी शिस्तीत राहावं ,चांगलं काम करावं ,मला जे पाहिजे ते त्यांनी करावं अशा चौकटीमध्ये आपण मुलांना बसवून मुलांकडून त्या त्या गोष्टी करण्याच्या अपेक्षा करतो आणि जर त्यांनी ते केले नाही तर मात्र आम्ही त्यांना बडवायचं ,चटके द्यायचे , अघोरी शिक्षा करायच्या, चप्पल झाडू यांनी फेकून मारायचं हे किती दिवस चालणार आणि या मुलांनी किती सहन करायचं???


                                   मित्रांनो आपल्या सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे आपण  असं करू नये हे नेहमी सांगत असतो परंतु असं का करू नये हे कोणीही सांगत नाही  आणि म्हणूनच सगळा घोटाळा होतो .

                                    मित्रांनो आज आपण पाहणार आहे शिक्षा का करू नये .


मित्रांनो या पृथ्वीवरती एक पेशीय पहिला सजीव निर्माण झाला .त्यानंतर सरपटणारे प्राणी ,सस्तन प्राणी निर्माण झाले . या प्राण्यांमध्ये मेंदू अतिशय लहान होता .मेंदूची कामही थोडी होती .या सजीवांमध्ये पहिले मुख्य काम होतं म्हणजे स्वतःचा जीव वाचवायचा , तग धरून राहायचं, आपल्यापेक्षा  मोठे जीव आहेत त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे त्यांच्यापासून लांब राहायचं. समजा स्वतःला वाचवताना दुसऱ्या वर हल्ला करायला लागला तरी तो करायचा पण स्वतःला सांभाळून जीव वाचवायचा. हे मेंदूचे पहिलं काम.
दुसरं काम म्हणजे प्रजोत्पादन. स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करणे. ही दोन्ही कामात सर्व जिवांनी इमानेइतबारे केली .त्यातल्या काही जीवांच्या शरीररचनेत हळूहळू बदल होत गेले सस्तन प्राणी आपल्या मुलांची पिल्लांची काळजी घेऊ लागले.

 मात्र सस्तन प्राण्यांमध्ये मानववंश निर्माण झाला या मानव वंशाच्या आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ आले आणि मेंदूतही बदल झाले .मेंदूचा आकार मोठा झाला कितीतरी काम वाढली. भाषा विकास झाला .त्यामुळे माणूस विचार करू लागला .विचारामुळे त्याचे प्रगती झाली त्यांना वेगळे शोध लावले पुढे त्यांनी घेतलेली झेप सर्वांना माहीतच आहे.

 तिसऱ्या टप्प्यावर माणूस विचार करू लागला . सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मेंदूवर प्रथिनांचे स्तर निर्माण झाले त्यातून सस्तन प्राण्यांचा भावनिक मेंदू तयार झाला.  तसेच भावनिक मेंदूवर प्रथिनांचे स्तर निर्माण  होऊन मानसाचा बौद्धिक मेंदू तयार झाला .


त्यामुळे आपण सरपटणारे मेंदूची मूळ काम म्हणजे स्वसंरक्षण ,प्रजोत्पादन आजही करतो. जगातील सर्व प्राणी हीच काम करतात. त्यामुळे एखादा जोरदार जीवावर बेतू पाहणारे प्रसंग आला तर स्वतःचा जीव कसा वाचवायचा आहे प्रथम जो बघतो आपल्याला बाहेर सुरक्षित कसे पडता येईल यासाठी जोरदार प्रयत्न करतो आणि काही कारणाने जर त्याला मूल होत नसेल तर विविध मार्गांचा अवलंब करून तो प्रजोत्पादन करतो.


 सस्तन प्राण्यांमध्ये काही प्रमाणात भावना दिसतात या भावना माणसाच्या मेंदूत अधिक विकसित झालेले आहेत .भावना व्यक्त करण्याचे विविध मार्ग शोधून काढलेले आहेत. अशा पद्धतीने माणसाचा मेंदू हा सर्वात प्रगत आहे तो आजही स्वतः काळानुसार नवीन नवीन बदल निर्माण करतो.


 माणसाच्या मेंदूमध्ये अशी त्रिस्तरीय रचना असते ज्या वेळी शरीराला संरक्षणाची गरज असते तेव्हा एकदम शक्ती वाढते हातापायात पळता पळता येते मेंदू अशा वेळी दुसऱ्या कशाचाही विचार करत नाही स्वतःचं शरीर संरक्षण करण्यासाठी सर्व अवयवांकडे वेगानं रक्तपुरवठा होतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण आनंदात असतो उत्साहात असतो किंवा आपल्याला राग आलेला असतो किंवा अतिशय दुःखी निराश असतो तेव्हा आपला रक्तपुरवठा हा भावनिक मेंदूकडे होत असतो आणि जेव्हा आपण बौद्धिक काम करत असतो लेखन-वाचन चित्र काढणे गप्पा मारणे या सर्व क्रिया करताना आपल्या बौद्धिक मेंदूकडे रक्तपुरवठा होत असतो. शरीराला जशी गरज असेल तसे तिथे रक्तपुरवठा होत असतो.


 मित्रांनो एखादी महत्त्वाची मीटिंग चालू असेल आणि अशा यामध्येच कोणी जर रागावून बोलायला लागलं तर सगळेच डिस्टर्ब होतात याचं कारण काय तर सगळ्यांचा रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडे होत असतो आणि अचानकच भावनांच्या पातळीवरची चर्चा रागवणे त्यामुळे सगळा रक्तपुरवठा पुन्हा भावनिक मेंदूकडे उतरतो ,या क्रियेला  'डाऊन शिफ्टिंग ' असे म्हणतात. आपण असाही अनुभव घेतला असेल की सगळी मोठी माणसं बोलत असताना एखादे छोटे बाळ आलं तर सगळ्यांना छान वाटतं मन हलकं होतं याचं कारण काय की जे सकारात्मक भावना निर्माण होते .


आपल्या पहिल्या उदाहरणांमध्ये हेच घडतं ज्यावेळी अभ्यास चालू असतो तेव्हा रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडे होत असतो अशा वेळेस जर मुलांना शिक्षक-पालक ओरडले तर त्यांचा रक्तपुरवठा खाली घसरून भावनिक मेंदूकडे येतो कारण मोठ्यांच्या मनामध्ये रागाची भावना असते . आणि जर त्यांना मारलं तर मुलाचा मेंदू सरपटणाऱ्या मेंदूकडे  जातो  म्हणजे तो संरक्षणाकडे  जातो . मुलांच्या मनामध्ये मात्र भीतीची भावना निर्माण होते अशा वेळेस मुलाला प्रश्नाचे योग्य उत्तर देता येत नाही कारण रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडे जात नाही.
 आई-वडील पालक-शिक्षक नुसता रागवत नाही तर मुलाला मारले सुरुवात करतात आणि त्यामुळे दोघांच्याही रक्तपुरवठा अजून खालच्या दिशेला म्हणजे सरपटणारे मेंदूकडे सुरू होतो आणि इथे मात्र पालक शिक्षक हे मोठे जीव दुसरे छोट्या जीवावर चक्क हल्ला चढवतात मूल मात्र स्वसंरक्षणाच्या पावित्र्यात जात असतो .या ' डाउन शिफ्टिंग'  नंतर काहीच सुचत नाही कारण रक्तपुरवठा हा सरपटणारे मेंदूकडे जात असतो म्हणूनच मित्रांनो शिक्षा का नको याचे उत्तर सर्वांना मिळाले असेल .


आपण बाहेरून आलो आणि सांगितलं पाणी आणून दे तर मुलं सहसा आपला ऐकत नाहीत ,आपला पारा चढतो आणि आपण रागावतो अशा वेळेस जर आपण आपल्या मुलांना सांगितलं," बाळा मी थकून आलोय मला पाणी आणून दे ."  तर मुलगा आपलं ऐकणार नाही ??


 मित्रांनो  सकारात्मक प्रयोग करा याचा नक्कीच फायदा आपल्या मुलांच्या आयुष्यावर होईल मुलांना पण शिक्षा करतो कारण आपण मोठी माणसे ! नेहमी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्ती असते त्याला स्वतंत्र अस्तित्व असतं त्यांना बरे वाईट चांगले वाईट या भावना समजत नाहीत अशा वेळेस आपण मुलांशी मनाने संवाद न साधता शरीराने संवाद साधतो आणि आणि इथेच शिक्षेची ठिणगी पडते. ही शिक्षेची ठिणगि मुलाच्या मनावर परिणाम करते आणि या ठिणगीच त्याच्या मनामध्ये  भितीचा गोळा होऊन मुलगा शांत अबोल होतो  नाहीतर मुलगा बंडखोर बनतो आणि आपलं नेहमीच वाक्य मारून मारूनकोडग  झालंय माझं पोरगं .


 मित्रांनो लहान मुलेही अंतःकरणाच्या आणि मोठी माणसे मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मुल  जितक लहान तितक त्याचं मन अप्रगल्भ  आणि अंतकरण जास्त सजीव आणि संवेदनक्षम असतं म्हणूनच मनाच्या स्तरावरून मुलांशी संवाद साधलेला हा संवेदनाहीन ठरू शकतो .मुलाशी आपला संवाद हा अंतकरणातून असावा.


  मित्रांनो ,'आयुष्यात मोठे होण्यासाठी पुस्तक वाचली पाहिजेत आणि पुस्तक आणण्यासाठी पैसे हवेत,' म्हणून घरी आलेल्या पाहुण्यांच्या खिशातील पाच रुपयाची नोट श्यामने चोरली. घरात कोणालाही कळले नव्हते .श्याम अलबेल पणे आई बरोबर गप्पा मारत बसलो होतो बोलता-बोलता आईला म्हणाला आई मी खरच मोठा होईल पुष्कळशी पुस्तक खूप वाचीन आई म्हणाली ,"मोठा झाला नाही तरी चालेल, पण मनाने चांगला गुणी रहा."  आईचे हे वाक्य श्यामच्या मनाला विंचू ने डंक मारल्यासारखे झोंबत होते .वडील म्हणाले शाम तू घेतले नाहीस ना घेतले असतील तर सांग ई म्हणाली," माझा शाम नाही हो  घ्यायचा. तो रागावला रुसला तरीसुद्धा दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणार नाही. चांगला आहे हो ."आता मात्र शामला राहवेना. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.

विश्वासाची धन्य जाती 'ज्याच्यावर विश्वास टाकला जातो. त्याची जात धन्य होते. ते लोक धन्य होतात .माझ्यावरील आईचा विश्वास आतामात्र उडणार होता. श्यामने घेतलेले पैसे पुन्हा आणून दिले .आईने विचारले," का  घेतलीस पैसे ." तेव्हा तो म्हणाला ,"आई तुला मगाशीच म्हटलं ना, आई मी  पुस्तके वाचून मोठा होईल."  आई म्हणाली ," अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचले, पण ते तर तो अजून शिकला नाहीस मग आणखी दुसरी पुस्तके कशाला हवीत?" 

या लिंक ला टच करा आणि श्यामची आई पुस्तक खरेदी करा.

         मित्रांनो आपण सर्व गोष्टी वाचतो परंतु त्या अनुभवात आणत नाही आचरणात आणत नाही .या गोष्टीवरून आईने श्यामला काठीने मारले नाही तर त्याच्याशी अंतकरणातून संवाद साधला.
 मित्रांनो आपल्याला मुलांशी अंतकरणातून संवाद साधता यायला पाहिजे. आपण मुलांना देत असलेले शिक्षण हे आनंददायी असलं पाहिजे एकमेव कारण हेच आहे .


आपल्याला मुलांना सरपटणाऱ्या मेंदूकडे घेऊन जायला जास्त आवडतं परंतु  मुलांचा रक्तपुरवठा हा बौद्धिक मेंदू कडे कसा वाढेल आणि त्याच्या मेंदूतील सकारात्मक वायरिंग जास्तीत जास्त कसं होईल याकडे आपण प्रयत्न केले पाहिजेत .

वरील लिंक ला टच करा आणि आपल्या प्रत्येक घरांमध्ये ऍक्टिव्हिटी बुक्स असाव्यात खेळ असावेत ते खरेदी करामित्रांनो जेव्हा आपण रागावतो मारतो तेव्हा मुलांच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात आणि त्या तशाच राहिल्या तर मुलांच्या मेंदूमध्ये नकारात्मक भावनांचा वायरिंग जोडलं जातं त्यांचा बौद्धिक मेंदू काम करत नाही.

 यापेक्षा मेंदूतील वायरिंगची जुळणी आनंदाची झाली तर मुलांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होते. प्रेम सुरक्षितता आत्मीयता आस्था यांच्या छटा या भावना सर्वाधिक गरजेचे असते .आनंदी मन आणि स्थिर बुद्धी या एकत्र नांदतात. म्हणून आपण पुन्हा अश्मयुगात जायला नको.

https://amzn.to/3dD0d6Z   TOP RAINCOATS ON AMAZON

 क्रमशः
 सचिन बाजीराव माने 
आरफळ सातारा
 sachinmane0383@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

प्रेरणा म्हणाले…
सचिनराव, खूपच सूक्ष्म विचार करुन लेखन करीत आहात.खूपच छान...!! आपले सर्वच लेख वाचनीय आहेत.