हट्टीपणाला औषध आहे

शिक्षण : शाळा ते करिअर

 भाग अठरावा
 पालक शिक्षक आणि सर्वांसाठी workbook for kids

हट्टीपणाला औषध आहे 


                  " मम्मी मला आत्ताच्या आत्ता पापड पाहिजे ." 
 स्वयंपाक पूर्ण झालाय आणि आता सगळे जेवायला बसलेत, तेवढ्यात  विहानचे रडगाणे सुरू होते.

"  मम्मी मला आत्ताच तळलेला पापड पाहिजे," 

मम्मी म्हणते ,"आम्ही आता जेवायला बसलोय जेवण झाल्यानंतर तुला पापड तळून देते ,"

" नाही ,मला आत्ताच पापड तळून पाहिजे," 

" आम्ही आता जेवायला बसलोय ,तेव्हा जेवण झाल्यानंतरच पापड तळून मिळेल," 

आता मात्र विहान मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करतो आणि हात पाय आपटायला आणि गडागडा लोळायला सुरुवात करतो.
 तेवढ्यात आजी म्हणते ," कशाला पोराला रडवतेस , दे त्याला पापड तळून ." 

उठून मम्मी त्याला पापड देते.

पापड तळून दिल्यानंतर तो म्हणतो ," मला तुकडे करून पापडाचे दे."

 पुन्हा थोड्या वेळाने तो म्हणतो ,"नाही मला तळलेले तुकडे केलेले पापड नको मला अख्खा पापड पाहिजे." मम्मी त्याला अख्खा पापड तळून देते .


थोड्यावेळाने पुन्हा तो म्हणतो ,"नाही मला पापड नको आता मला चपाती आणि भाजी खायची आहे ," 

पण आत्ता स्वयंपाकामध्ये चपाती बनवलेली नसते.

 मग आता मात्र आईचा पारा चढतो आणि मम्मी त्याला ओरडायला आणि मारायला सुरुवात करते ..त्याला मारताना पाहून आजी त्याला जवळ घेते आणि त्याला सांगते की,"  बाळा आत्ता आपण स्वयंपाकामध्ये चपाती बनवलेली नाही ,भाजी भाकरी खा. चल मी तुला चपाती ऐवजी भाजी भाकरी खायला देते," 
 आजी त्याला चपाती भाजी भाकरी बाहेरच्या खोलीमध्ये घेऊन खाऊ घालते.  आता विहान शांत होतो.  पण त्याला मनातून आईचा खूप राग आलेला असतो . आणि अजित आला खूप जवळची वाटते तेव्हा नेहमी आय ओरडली तर तो पळत पळत आजीकडे जातो आणि आजी त्याला समजून घेत असते.

 
                      मित्रांनो हा प्रसंग प्रत्येक घरांमध्ये  घडत असतो .आपल्या घरामध्ये असा एकही व्यक्ती नसेल की ,ज्याने लहानपणी हट्ट केला नसेल आणि मोठे झाल्यानंतर हट्ट पुरवला नसेल .

लहानपणी आपण सगळेच हट्ट करतो प्रत्येक गोष्टीसाठी त्यावेळी आपल्या आई वडील आपल्याला रागावतात प्रसंगी मारतात सुद्धा. कारण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे आपला मेंदू सरपटणाऱ्या  मेंदूचे कार्य आणि आता आपण मोठे झाल्यानंतर आपण आपल्या मुलांनी हट्ट केले की आपण लगेच ते पुरवतो .कारण आता आपण म्हणतो आपले पैसे आहेत आम्हाला लहानपणी मिळालं नव्हतं माझ्या मुलाला मिळाला पाहिजे आणि म्हणून तो मागेल ते हव्या त्या गोष्टी देतो आणि भविष्यातील खूप मोठे संकट आपणच निर्माण करतो .


कारण लहानपणी त्याला सर्व गोष्टी आपोआप मिळत असतात. मात्र मोठे झाल्यानंतर त्याला परीक्षेत येणारे अपयश ,कोणी नकार दिला ,नाही म्हटले तर ते पचवणं अवघड होऊन बसतं आणि अशा वेळेस मुलं प्रसंगी ..............करतात .म्हणून हट्ट पुरवणं आणि हट्टीपणा करणं या दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत .


मित्रांनो मुलं हट्ट करतात याला पहिले कारण असते म्हणजे अनुवंशिकता आणि दुसरे कारण म्हणजे त्यांच्यातील बौद्धिक शारीरिक आणि मानसिक कमतरतेचे लक्षण असते हट्टी मुलही ही त्यांचा हट्टी स्वभाव या मानसिक भावनिक कमतरतेतुन आलेला असतो.

आपण मुलांना कधीही समजून घेत नाही. पैशाच्या जोरावर आपण वेळ मारून नेत असतो. 

 मित्रांनो आपण जर पाहिलं तर हट्टी मुलं चा स्वभाव हा एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच असा दृढनिश्चय असतो.

 ती गोष्ट वस्तू मिळवण्यासाठी वाट्टेल ती करतात या हट्टी पणातील चांगल्या गुणांचा उपयोग आपल्याला मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसा करता येईल असा सकारात्मक विचार नेहमी केला पाहिजे .

 हट्टी मुले एखादी वस्तू मागितल्यानंतर आपण,' जाऊदे .'म्हणून मुलांना ती वस्तू लगेच देतो.

 काही वेळेस मुलं हट्ट केल्यानंतर आपण त्यांना नाही म्हणतो अशावेळी मुलं मोठमोठ्याने ओरडायला लागतात अगदी अंगावर धावून येतात, डोकं आपटतात , हात पाय आपटतात, गडागडा  लोळतात .मग मात्र आपला नाईलाज होतो किंवा वेळ मारून नेण्यासाठी त्यांना वस्तू मिळवून देतो किंवा आपणच मोठ्याने ओरडून रागावून त्यांना मारतोही.


 मित्रांनो मुलं वस्तू किंवा गोष्ट मिळवण्यासाठी मग आदळाआपट आरडाओरड करून जर ती गोष्ट मिळाली तर तो ती  मुलांचा यशस्वी फॉर्म्युला होतो आणि आपणही नकळत मुलांचा हट्टीपणा ला खतपाणी घालतो.

हट्टी मुलांच्या स्वभावाला कोणत औषध आहे.

1)  मुलांना समजून घेणे-
 मुलाचे म्हणणे ऐक एखादी गोष्ट वस्तू मागितल्यानंतर आपण मुलांना लगेच न ओरडता रागवता पहिल्यांदा त्याचं म्हणणं काय आहे त्याला ती गोष्ट वस्तू कशासाठी हवे त्याची गरज काय आहे हे प्रश्न मुलांना विचारून तो हट्ट आपण पुरवायचा का नाही हे मुलांना समजून गेले पाहिजे घेतले पाहिजे 

2) मुलांना मारणे हे औषध नाही 
 मागील भागात पाहिल्याप्रमाणे सरपटणारे मेंदूचे काम चालू होतं  क्षमतेने मोठ्या  आपल्यापेक्षा लहान ना नेहमी मारतात आणि लहान  स्वतःचं रक्षण करण्याकरिता  त्यांचं मेंदूची कार्य चालू होतं .
म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या मुलांना मारल्यामुळे त्यांचा हट्ट थांबलाय असं होत नाही ,मोठे झाल्यानंतर हीच मुलं पुढे जे शारीरिक क्षमतेने अक्षम आहेत अशा वर्गातील मुलं वरती हात चालवतात ,मारामाऱ्या करतात .हा त्यातील मोठा दोष आहे.

3) नाही म्हणायला शिका -
जर मुलाने केलेला हट्ट हा योग्य आहे की नाही हे पाहून मुलांना खंबीरपणे नाही म्हणा. जेव्हा आपण मुलांना न रागवता नाही म्हणून तेव्हा मुलालाही समजेल की आपण हट्ट करण्यात काही अर्थ नाही.

4) शांत बसा अबोला धरा 
मुलांनी खूप आरडाओरडा केला गोंधळ घातला तर आपण त्याच्या दुप्पट त्याला न रागवता शांत बसा आणि मुलाचा हट्टीपणा चा त्यावेळचा तो वेळ निघून जाईल .मुलगाही आपोआप शांत होईल.

5)  मुलांचं मन वळवायला शिका -
जर मुलांनी एखादी गोष्ट किंवा हट्ट केला असेल तर मुलांना अशा वेळी शांतपणे त्यांना आवडणारी दुसरी गोष्ट करायला सांगा .पण ती गोष्ट पुन्हा दुसरा हट्ट निर्माण होईल अशी नसावी. मुलांचं मन वळवणे ही साधी सोपी गोष्ट नाही. सर्वप्रथम आपल्या मुलांना समजून घेऊन त्यांचं मन इतर गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करा.

6) गोष्टी सांगा-
मुलांना एखाद्या वस्तूचा गोष्टीचा हट्ट केला तर  तो हट्ट किंवा ती गोष्ट थांबण्यासाठी त्याला इतर संस्कारक्षम गोष्टी सांगा. योग्य-अयोग्य काय ते सांगा मुलाने धरलेला हट्ट हा योग्य आहे की अयोग्य आहे हे मुलांना समजून सांगा .


वरिल लिंकला टच  करा .खरेदी करा अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी

7) मुलांना वेळ द्या .
काही वेळी मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असताना हे अडथळे निर्माण होत असतात अशावेळी मुलांना समजून घेऊन त्यांना थोडा वेळ द्या. मुलांच्या वागण्याची मागील परिस्थितीचा विचार करा. भूक, खूप खेळणे ,गर्दी ,आवाज अशा विशिष्ट गोष्टींमुळे मुलांच्या विकासात अडथळे निर्माण होतात आणि अशा  मुलं हट्टी बनतात.

8)  धीर सोडू नका - 
काही वेळा  आपल्या घरी पाहुणे येतात किंवा पण चारचौघांमध्ये उभे असतो अशावेळी आपल्या कडे हट्ट धरतात आणि आपण'  चार चौघात तमाशा नको,' म्हणून मुलांच्या हट्टीपणाच्या गोष्टी  पुरवतो. अशावेळी मुलांना नाही म्हणा .

9)  आपल्या मुलांना त्यांच्या उपक्रमांना प्राधान्यक्रम द्यायला शिकवा -
 हट्टी मुल अतिशय दृढनिश्चयी आत्मविश्वासू आणि कार्यक्षम असतात अशावेळी मुलांच्या या गुणांचा उपयोग आपल्याला त्यांना आवडणाऱ्या खेळ कृती यांकडे वळवून त्याचा सदुपयोग करायला शिका.

10) योजना तयार करा.
 मुलाने एखाद्या वस्तूचा किंवा गोष्टीचा हट्ट धरला तर ती तो हट्ट योग्य की आयोग्य यासाठी मुलांना समजून सांगण्यासाठी ची योजना तयार करा आणि त्या प्रमाणे मुलांना ती गोष्ट योग्य की अयोग्य हे आपोआप समजेल.

11) मुलांना स्वतःच्या स्वतः करता येणाऱ्या गोष्टींसाठी नाही म्हणायला शिका-
 मुलांमध्ये सर्व क्षमता असतात आपण मुलांना या क्षमता विकसित करण्यापासून अडवतो. आपण ती गोष्ट मुलगा करत असेल तर आपणच त्यांना ती मदत करतो आणि मुलांना पांगुळ बनवतो. अशा वेळेस मुलांना जर ती गोष्ट करता येत असेल तर आपण मध्ये मध्ये लुडबुड न करता मुलांना सरळ नाही म्हणायला शिका आणि त्याला सांगा तुझी तू गोष्ट किंवा हट्ट तुझा तू पूर्ण कर .

12) मुलांच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण गोष्टी उपक्रम करायला द्या
मुलांचं मन वाढवण्यासाठी बौद्धिक किंवा इतर उपक्रम खेळ जे मुलांच्या दृष्टीने नवीन असतील अशा गोष्टी मुलांना करायला द्या त्यांच्यासमोर आव्हान नवीन निर्माण करा जेणेकरून मुले त्यात रमतील आणि त्यांना आनंद मिळेल.


वरिल लिंकला टच  करा .खरेदी करा  activity books for kids 9-12
मित्रांनो अशा विविध कृतींतून गोष्टींतून आपल्या मुलांचा हट्टी स्वभाव हा आपल्याला सकारात्मक दृष्टीकोणातून कसा बदलता येईल आणि त्याचं मन त्याला आवडणाऱ्या गोष्टींकडे आपल्याला खेचून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील .

BUY PLAY DOH FOR CHILD 


त्याच्या अंगी असणारे क्षमतांचा पुरेपूर वापर आपण त्याच्या बौद्धिक कामाकडे जास्तीत जास्त वळू आणि आपल्यातील सरपटणाऱ्या मेंदूला जागृत न करता आपण मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये हट्टीपणाचा कसा उपयोग करू याचा विचार करावा .

Buy Reading and writting toys and games क्रमशः 
सचिन बाजीराव माने
 आरफळ सातारा 
sachinmane0383@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
लेख आवडला वाचनीय आहे .
YES ! I CAN !!! म्हणाले…
खूप खूप आभारी आहे
प्रेरणा म्हणाले…
पालकांचे जबरदस्त उद्बोधन करीत आहात आपल्या लेखानीतून...
keep it up...!!