प्रेरणा

शिक्षण शाळा ते करिअर 


पालक शिक्षक आणि सर्वांसाठी


तुझ्या लक्षात राहत नाही का ? 
हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकला टच करा

 प्रेरणा                        मित्रांनो आज पहिल्यांदा आपण गरुडाची गोष्ट पाहणार आहोत. गरुडाच जस-जसे वय वाढायला लागते  तशी त्याची चोच   झिजायला लागते . पंख थकून जातात आणि नीट उडता येत नाही.
शिक्षण : शाळा ते करिअर

 खरंतर गरुड सत्तर वर्षे जगू शकतो पण एवढे करण्यासाठी गरुडाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात .यावेळी त्याच्यासमोर दोन पर्याय असतात प्राप्त परिस्थितीला स्विकारुन जीवन संपवायचं किंवा मग 150 दिवसांच्या खडतर व वेदनादायी प्रक्रियेने स्वतःचं पुनरुज्जीवन घडवून आणायचं. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पर्वताच्या कपारीमध्ये असणारे आपल्या घरट्यात स्वतःला अज्ञातवासात कोंडून घेणे .मग ती झिजलेली वाकडी झालेली  चोच दगडावर आपटायला सुरुवात करतो. जोपर्यंत तीच गळून पडत नाही तोपर्यंत तिला तो आपटतो व जुन्या चोचीच्या ठिकाणी त्याला नवी कणखर बाकदार चोच  येते .
शिक्षण : शाळा ते करिअर


                                        त्यानंतर तो आपल्या जुन्या  झडणाऱ्या पंखांना आपटायला सुरुवात करतो आणि त्यांनाही वेदनेच्या भरात शरीरापासून वेगळे करतो .हळूहळू त्याला नवे तेजपुंज पंख फुटतात. पुनरुज्जीवनाचा पाच महिने चाललेल्या प्रवास त्याच्या रोमारोमात  नवचैतन्य भरतो आणि पुन्हा थकलेला गरुड तीस वर्ष अत्यंत उभारीने जगतो .


                                        मित्रांनो आपल्या सर्वांचे आयुष्य असच घडत असतं आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात की त्या वेळेला आपण असं ठरवतो की आता नाही परंतु जर आपण असं ठरवलं आपल्याला झगडायचे आणि मिळवायचे तर आपण प्रत्येक आयुष्यामध्ये आपले ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक गोष्ट प्राप्त करत असतो . यासाठी प्रेरणा निर्माण व्हावी लागते
शिक्षण शाळा ते करिअर


                                  मित्रांनो आपल्यालाही जेवढ आयुष्य मिळाले तेवढेच आयुष्य महात्मा गांधी लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू अल्बर्ट आईन्स्टाईन न्यूटन यांनाही मिळाल होत. मग आपण असे तरी स्वप्न बघतो का त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येयाने प्रेरित होतो का?  प्रेरित झाल्या नंतर पुन्हा एक एक पायरी गाठली का ? प्रेरणा मिळाली का ?असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.


                                     मित्रांनो हे सगळं घडण्यासाठी आपल्याला इतरांनी प्रेरित करायची गरज नसते यासाठी एकच गरज असते ते म्हणजे आपल्या आत मध्ये ठिणगी पडण्याचा. जेव्हा ठिणगी पडेल आणि ठिणगीचा रूपांतर एका ऊर्जेने भरलेल्या स्फूलिंगात होईल तेव्हा आपलं मोठं  होणं सुरू होतं . यालाच प्रेरणा मिळाली असे म्हणतात.

वरील लिंक ला टच करा व एमपीएससी साठी लागणारी  पुस्तके खरेदी करा


                                       मी सरपंचाचा मुलगा असल्यामुळे नेहमी मास्तरांच्या खुर्चीत बसायचो आणि गरीब वर्ग मित्रांना  त्रास द्यायचो.आताच्या भाषेत रॅगिंग करायचो. शिक्षकांनी विनंती केली की खुर्चीतून समोरच्या रांगेत जाऊन बसायचं. खरतर मला हुशारीचा, वडील सरपंच असल्याने थोडा माज चढलेला होता.


                                        एके दिवशी असाच शिक्षकांच्या खुर्चीत वर बसलेलो होतो तेवढ्यात नव्या वर्गशिक्षिका कदम बाई आल्या. माझं लक्ष नव्हतं. सगळेजण उभे राहिले .मी मात्र गुर्मीत बसूनच राहिलो .तशाच त्या माझ्याजवळ आल्या व माझ्या दोन कानशिलात भडकावून दिल्या.

"  तू पहिलवान चा मुलगा आहेस ना ? " 
 " हो "  
" गावाचा दादा "  
" शिक्षकांचा अपमान करतोस ,चांगल आहे का असं वागणं ? असंच वागत राहिलात तर मोठा गुंड होशील " 
 स्वतःच ,आमच आणि आई वडिलांचे नाव उज्वल करतील ,भावकीच्या गुंड मुलांच्या मदतीने गरीब मुलांना असा त्रास देतोस आहेस असं केलंस तर खेड्यातल्या किड्या मुंग्यांसारखे दुसऱ्यावर अवलंबून राहशील. 


अरे तुझी काय ओळख आहे का नाही ? 

वरील लिंकला टच करा व विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेल मन मे है विश्वास पुस्तक खरेदी करा

हुशार पण बिघडलेला गावगुंड मुलगा 
विद्या विनयेन शोभते नम्रता अंगी नसेल तर हुशारीला कवडीची किंमत नाही, चालता हो  माझ्या वर्गातून...
 अशा त्वेषानं आडवेतिडवे बाई बोलल्या पण या अपमानाने माझ्यातला स्फुल्लिंग नक्कीच पेटला

               त्यानंतर माझी शाळा बदलली मला चांगले गुरुजी मिळाले आणि त्यांनी नेहमीच मला प्रेरित केलं .माझे नवे वर्गशिक्षक लाखोळी गुरुजी होते एकदा वर्गात त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला,"  तुम्ही मोठे झाल्यावर कोण होणार ?"  हा प्रश्न विचारला होता. का कोणास ठाऊक मी त्यांना विचारलं,"  गुरुजी सगळ्यात मोठा  अधिकारी कोणता? " गुरुजी,"  कमिशनर" असे उत्तर दिले.

 मग मी विचारलं,"  मी कमिशनर होऊ शकतो का?" 

 सगळे मला हसायला लागले 

तेव्हा गुरुजींनी माझं कौतुक केलं आणि स्वप्न पहायचं तर खूप मोठी. तुम्ही गाठलेली उंची ही तुम्ही कुठून सुरुवात केली या पासून मोजली जाते .उच्च ध्येय ठेवायचे , स्वप्न पाहायची स्वप्नांना वास्तवात उतरण्यासाठी जिद्द ठेवायची त्याला प्रयत्नांची जोड द्यायची आणि मग काय तुम्ही देशाचे राष्ट्रपती होऊ शकतात असं नेतृत्व करू शकता. हे त्यांचे शब्द सुनामी प्रमाणे ऊर्जेची ला घेऊन आले आणि माझी गाडी रुळाला लागली. मला प्रेरणा मिळाली.

शिक्षण शाळा ते करिअर

 मित्रांनो खूप सारे परिश्रम केले की आपल्याला ध्येय प्राप्त करता येते आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्या मनातील स्फूल्लिंग प्रज्वलित करावं लागतं .  स्फूल्लिंग प्रज्वलित करण्यासाठी आपल्या मनामध्ये ठिणगी पडावे लागते आणि ही ठिणगी आपल्याला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये रूपामध्ये पडत असते .फक्त त्याचे रूपांतर आपल्याला स्फूल्लिगात करता यायला पाहिजे. हीच खरी प्रेरणा. या नंतरचा सगळा प्रवास आपणा सर्वांना माहितच आहे .तो मी म्हणजेच विश्वास नांगरे पाटील 


                                    मित्रांनो  प्रेरणा म्हणजे काय ?  वर्तमानाचा भाग आणि तो कार्य करण्यास ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यास आपल्याला भाग पडत असतो .जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण उपलब्ध असलेल्या मार्गांचा अवलंब करून शोध घेतो .आपल्याला हवे असलेले अन्न आपण मिळवतो.  अन्नाचा शोध घेतला की आपलं काम थांबतं आणि आपण पोटभर जेवलो की आपल्याला समाधान मिळतं.


                            ज्या विशिष्ट कारणांमुळे किंवा घटकांमुळे विशिष्ट ध्येयासाठी माणूस कार्यप्रवृत्त होतो या अवस्थेला प्रेरणा म्हणतात .


                                 मित्रांनो भूक लागणे ,तहान लागणे ,झोप, मातृत्व ,तापमान नियंत्रण  या शारीरिक प्रेरणा आहेत .प्रत्येक माणूस हा या ना त्या मार्गाने पूर्ण करत असतो. मात्र अडथळ्यांवर मात करून आणि शक्तीचा योग्य वापर करून काहीतरी अवघड गोष्ट जितक्या शक्य तितक्या लवकर प्राप्त करून घेणे याला अचीवमेंट असे म्हणतात आणि ही अचिव्हमेंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या ना त्या मार्गाने येत असते आणि आपण ती प्राप्त करतो .

                                     ज्या व्यक्तींमध्ये अचीवमेंट प्राप्त करायची जिद्द असते ती व्यक्ती हाती घेतलेले कोणतेही कार्य उच्च दर्जाने करत असल्याचे आढळते. या स्वीकारलेल्या कार्यामध्ये यशस्वी होण्याचा चिकाटीने प्रयत्न करत असते आणि आव्हानात्मक काम स्वीकारून ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात जास्त पसंती असते. ही प्रेरणा व्यक्तींमध्ये ठिणगी प्रमाणे काम करते. त्यामुळे व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होऊन आर्थिक विज्ञान नेतृत्व आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करून सर्वोच्च शिखरावर जात असते .

                                मित्रांनो आपल्या मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर सर्वप्रथम कुटुंबाच्या माध्यमातून या प्रेरणांची निर्मिती होते .मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी नंतर इतर समाजातील व्यक्तींची नंतर समाजाशी संपर्क येतो आणि त्यातूनच या प्रेरणा विकसित होत जातात. शाळेत गेल्यानंतर शिक्षकच मुलांची प्रेरणा होतात.

                               मित्रांनो आपल्या मुलांमध्ये प्रेरणा विकसित होण्याची पहिली संधी मुलाला कुटुंबातूनच मिळत असते .आणि म्हणून जास्तीत जास्त आपण विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काम केले पाहिजे. त्याच्या मनामध्ये ठिणगी निर्माण झाली पाहिजे आणि मोठ्या ऊर्जेत रुपांतर होऊन आपला मुलगा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करून सर्वोच्च शिखरावर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु आपण मुलांच्या भौतिक सुख आणि सुविधांकडे जास्त लक्ष देतो. यामध्ये आता सांगितलेल्या प्रेरणा आहेत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो त्यामध्ये अन्न झोप आणि इतर शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो

                                परंतु त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हातरी ठिणगी पडते आणि त्यातील ऊर्जेत रूपांतर होऊन विविध क्षेत्रांमध्ये माणूस नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी तयार होतो. ही प्रेरणा आपल्याला प्रत्येक मुलांमध्ये निर्माण झाले पाहिजे. जर आपण शालेय जीवन पाहिलं तर मुलाला वाचन करण्यासाठी प्रेरणा निर्माण केली पाहिजे .


                                मित्रांनो वाचता यायला कोणत्याही जादूगाराची गरज नसते तर मुलाच्या मनामध्ये वाचन करण्यासाठीची प्रेरणा निर्माण करणे हे आपलं पहिलं काम आहे. त्याचबरोबर मुलांना गणिताची भीती वाटत असते मित्रांनो गणित शिकणे यासाठीचे प्रेरणा मुलांना विविध उपक्रम खेळ कृतीतून दिली पाहिजे .अशा विविध गोष्टी सांगता येतील की ज्यातून आपण विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करून विद्यार्थी प्रत्येक अडचणीत पूर्ण करून शक्य तितक्या लवकर आपलं काम पूर्ण करेन. मित्रांनो प्रेरणेची सुरुवात अडचणींपासून असते जर आपण अडचणींची ठिणगी जिद्दीचे प्रयत्न आणि चिकाटीने उत्साह वाढवला तर आपण प्रत्येक अडचणींवर मात करू शकतो.

                                 मित्रांनो बक्षीस दिलं म्हणजे प्रेरणा मिळते असं नाही किंवा शिक्षा केली म्हणजे प्रेरणा मिळते असे नाही तर अशा कोणत्या तरी गोष्टी घडल्या पाहिजेत की ज्यातून मुलांमध्ये ठिणगी पडेल आणि तिचं रूपांतर ऊर्जेत होईल. आता हे कसं घडत ??? 

 हालाखीच्या कुटुंबात जन्मलेली आणि पित्याचे छत्र हरवलेली औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबल पदाच्या मुलाखती च्या पूर्वतयारीसाठी रेल्वेने लखनऊला जात असताना ही मुलगी एका भयंकर अपघात आपला पाय गमावते . तिच्याकडे गळ्यातील सोन्याची चेन असते ही चैन ट्रेनमध्ये चोरटे चोरण्याचा प्रयत्न करतात पण ती प्रतिकार करते आणि या झटापटीत याच चोर तिला दारातून बाहेर फेकून देतात. चालू रेल्वेमधून ही मुलगी दुसऱ्या रेल्वे रुळावर पडते आणि जबरदस्त मार लागल्यामुळे तिला हालचाल करता येत नाही. तेवढ्यात पडलेल्या रेल्वे ट्रॅकवरून जोरात रेल्वे गाडी येते आणि काही क्षणात कळायच्या आतच अंगावरून गाडी जात. डावा पाय निकामी होतो. रात्रभर असह्य यातना. रात्रभर रोडावर उंदीर आणि घुशी तोडलेले लचके, रेल्वेच्या रुळावर बेशुद्ध अवस्थेत तिला दुसऱ्या दिवशी काही ग्रामस्थ दवाखान्यात नेतात .परंतु तिथे सुद्धा भूलतज्ञ उपलब्ध नसतात . भूलीशिवाय पायावर शस्त्रक्रिया होते. 

तिची ही सगळी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते .अशा वेळेस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येते आणि त्याच्यावर उपचार केले जातात . यावेळी लोकांनी पैशांची मदत केलेली असते  परंतु मानसिक धक्का देणारी आणखी एक गोष्ट घडते ते म्हणजे  तिच्यावर  लोकांनी बलात्काराचा प्रयत्न केला अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध होतात  असं काही घडलं नसतं हे फक्त तिलाच माहीत असतं  परंतु समाजाला तोंड द्यायचं कसं  ? 

शिक्षण शाळा ते करिअर

अशावेळी ही जिद्द हरत नाही . दवाखान्यात असतानाच एक पुस्तके वाचण्यात येतात आणि त्याच वेळी ठरवते  की जगातील सर्वोच्च गोष्ट करायची की ज्यामुळे समाजात मला सर्वोच्च स्थान मिळेल आणि म्हणून जगात सर्वोच्च काय आहे ? तर जगात सर्वोच्च आहे एव्हरेस्ट शिखर आणि म्हणून एक पाय नसतानाही ती कृत्रिम पायांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करते आणि पहिली विकलांग महिला ठरते.

शिक्षण शाळा ते करिअर

                                        मित्रांनो सकारात्मक प्रेरणा घेतली तर आपण जगात अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो . पण  पण ते आपण स्वतः ठरवलेले असले पाहिजे .स्वतः ठरवलं तर आपल्या निर्णयाबद्दल इतरांना काय वाटेल? आपल्या प्रयत्नांना यश मिळेल की नाही? स्वीकारला तर आपण जिंकू किंवा मरू हे प्रश्न असतात .अशा प्रश्न पुढे अडथळे दिसत नाही .

 मित्रांनो दवाखान्यात असताना सकारात्मक विचारांची ठिणगी या मुलीच्या मनात  पेटते आणि ही मुलगी जगातील सर्वोच्च शिखर पार करते . ती मुलगी म्हणजे अरुणिमा सिन्हा .

मित्रांनो अरुणिमा सिन्हा यांनी या प्रसंगांमधून नकारात्मक प्रयत्न घेतले नाही तर सकारात्मकतेने विचार करून सर्वोच्च ध्येय प्राप्त केले. आपल्या आयुष्यातही असे अनेक कठीण प्रसंग घटना घडत असतात .परंतु आपण त्यामधून नकारात्मक प्रयत्नांना घेता सकारात्मक प्रयत्ने आपले आयुष्य ही सर्वोच्च बनवू शकतो आपल्या मुलांनाही नेहमी आपण सकारात्मक प्रेरणा घेण्यासाठीच प्रोत्साहित केले पाहिजे.

मित्रांनो बारावी सर्व विषयात नापास झालेला तरुण मुलगा पुढे जाऊन आयपीएस अधिकारी बनतो त्याचे नाव आहे मनोज कुमार.
शिक्षण शाळा ते करिअर
आज आपण पाहतो आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडतात परीक्षेत कमी मार्क मिळाले, आई ओरडली ,वडिलांनी मारलं ,शिक्षकांनी मारलं ,मोबाईल मिळाला नाही अशा अनेकविध कारणांमुळे मुलं नको त्या प्रकारांना बळी पडतात. याउलट अशा मुलांमध्ये आपण सकारात्मक करण्याची ठिणगी पाडली पाहिजे. .ही ठिणगी चरित्रे कार्यक्रम प्रसंग यातून निर्माण होत असते.

वरील लिंक ला टच करा व एम यूपीएससी ची मराठीतील पुस्तके खरेदी करा


मित्रांनो आपण जेवढी महान चरित्रे वाचली. ही चरित्रे एका रात्रीत निर्माण झाली नाहीत. या सर्व व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काहीना काही कठीण प्रसंग अडचणी अडथळे आले होते आणि त्यातून त्यांनी सकारात्मक प्रेरणा घेऊन वाट काढली मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अडथळे अडचणी निर्माण होत असतात त्यातून आपण सकारात्मक प्रयत्न घेऊन जर पावले टाकली तर आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकतो.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची गोडी लागली याचे एकमेव कारण ते जेव्हा शाळेत शिकत होते. तेव्हा ते दलित असल्यामुळे त्यांचे कोणी मित्र नव्हते,त्यांच्याशी बोलायचं नाही, खेळायचं नाही ,त्यांना कोणीच मित्र नव्हते आणि म्हणून एके दिवशी शाळेत जात असताना भर पावसामध्ये कोणी मित्र नाही म्हणून रडत रडत चाललेले असतात .
शिक्षण शाळा ते करिअर

अशा वेळी त्यांचे वडील त्यांना वाचनासाठी  पुस्तक आणून देतात आणि त्या दिवशीच ठरवतात की ,' पुस्तक माझा मित्र आहेत' .इथूनच त्यांच्या पुढील आयुष्याला सुरुवात होते आणि जगातील सर्वोच्च आदर्श विद्यार्थी बनण्याचा मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो.


ज्योतिराव फुले हे आपल्य मित्राच्या वरातीमध्ये सामील झालेले असतात .अशा वेळेस  वरातीमध्ये असणारे लोक ज्योतिरावांना चिडवतात.त्यांच्या मनामध्ये  जातीय द्वेष निर्माण होत नाही

 
शिक्षण शाळा ते करिअर


तर  गोरगरिबांसाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते  आणि गोरगरीब दीनदलित यांसाठी कार्य करून ते' महात्मा' बनतात .


मित्रांनो आपल्या सगळ्यांमध्ये विविध प्रकारच्या प्रेरणा या पुस्तक वाचून ,दुसऱ्यांचे भाषण ऐकून निर्माण होत नसतात .तर प्रेरणा निर्माण होण्यासाठी सतत धडपड करावी लागते, ध्येय ठरवावं लागतं, त्यासाठी लागणारे अडथळे पार करावे लागतात आणि आपल्या अंतर्गत शक्तीचा पुरेपूर वापर करून आपल्याला ती गोष्ट प्राप्त करता येते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकामध्ये ठिणगी पडली पाहिजे. हे ठिणगी सकारात्मक असावी .


क्रमशः 

सचिन बाजीराव माने
 आरफळ सातारा
sachinmane0383@gmail.com 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या