कोरोना काळातील मुलांचे शिक्षण

शिक्षण :  शाळा ते करिअर


 पालक ,शिक्षक आणि सर्वांसाठी


 कोरोना काळातील मुलांचे शिक्षण 

कठीण समय येता......

covid-19  महा भयंकर विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे .अशा काळामध्ये लॉकडाऊन  हा एकमेव उपाय असल्याने महासत्ता असणाऱ्या देशांना आणि आपल्यासारख्या विकसनशील देशांना सुद्धा  याचा महाभयंकर फटका बसलेला आहे.  या  कोरोना काळामध्ये  सर्व व्यवस्था ठप्प झाले आहेत. उद्योग, शिक्षण , आरोग्य , व्यवसाय  ,वाहतूक अशा सर्व व्यवस्थांवर लॉकडाऊनचा गंभीर परिणाम दिसून येतोय .


यामध्ये  हळू सर्व व्यवस्था  सुरू होत असतानाच  सामाजिक अंतर राखून  काळजीपूर्वक  व्यवहार करावे लागतात.  अशा परिस्थितीतच  आरोग्यव्यवस्था जितकी महत्त्वाची आहे  तेवढ्यात प्रमाणामध्ये  शिक्षण व्यवस्था सुद्धा  महत्त्वाचे आहे.  इतर सर्व  गोष्टी  सामाजिक अंतर राखून सुरू होत असल्या तरी  शिक्षण  म्हणजेच शाळा  या सामाजिक अंतर राखून कशा सुरू होतील?  शाळा सुरू झाल्या नाहीत तर मुलांचे शिक्षण होणार नाही का?  जर शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी काय सुविधा असतील आणि कोणत्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे या सर्व बाबींचा आढावा आपण या भागात घेणार आहोत 
शाळा बंद शिक्षण सुरू


आपणा सर्वांनाच माहिती आहे की कोरोना या महाभयंकर साथीमुळे आपल्या सर्वांना घरातच बसावे लागत आहे अशावेळी शिक्षण बंद ठेवून कसे चालेल ......कारण आज 2020 साली पहिलीत प्रवेश घेतलेला आपला मुलगा 2030साली दहावीत असणार आहे .अशावेळी 22 व्या शतकामध्ये शतकाच्या सुरुवातीस प्रवेश करत असताना जग ,जगातील व्यवहार ,या जगामध्ये जगण्यासाठी लागणारे कौशल्य कोणती असतील आणि ते आत्मसात त्यावेळेस करून चालणार नाही तर आजपासूनच आपल्याला सामोरे गेले पाहिजे आणि त्यासाठी आपण तयार आहोत का??


 अचानक  हा क्रांतिकारक बदल आपल्याला स्वीकारावाच लागेल .बदल म्हणजे नवीन जगण्याची सुरुवात...
 जर आपण बदल स्वीकारले नाही तर आपण जैसे थे राहू .जीवसृष्टी मध्ये ज्या जीवांनी बदल स्वीकारले नाहीत ते नामशेष झाले आणि म्हणूनच आता सर्वात महत्वाची गरज आहे ते म्हणजे शिक्षण आणि हे शिक्षण घेण्यासाठी आपणास सर्वांना प्रेरणा घेऊन गरजेतूनच शिक्षण कसे पूर्ण करता येईल आणि त्यासाठी बदल स्वीकारून समायोजन करावे लागेल. समायोजन म्हणजे काय प्राप्त परिस्थितीत स्वतःमध्ये बदल घडवून आणणे .


यासाठी सर्व मुलं आपापल्या घरी आहेत आणि घरामध्ये मुलांची शिक्षण हे पालकांच्या मदतीने करावे लागेल .अशा वेळेस पालकांना मुलांची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे .शिक्षक हा महत्वाचा घटक आहेतच पण त्याच बरोबर आज मुलांबरोबर 24 तास राहणारे पालक, आई वडील ,आजोबा ,मोठा भाऊ बहीण या सर्वांना मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी लागेल.


 मित्रांनो आजच्या आधुनिक काळामध्ये शेती व्यवसायामध्ये जसे आधुनिक बदल झाले आणि ते आपण स्वीकारले. तसेच बदल शिक्षणामध्ये आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करून स्वीकारावेच लागतील. संपूर्ण जगामध्ये ज्या व्यवस्थेवर आमूलाग्र बदल झाला ती व्यवस्था म्हणजे शिक्षणव्यवस्था .पारंपारिक शिक्षण पद्धती सोडून अचानक आपणास आधुनिक शिक्षण पद्धतींचा स्वीकार करावा लागणार आहे आणि तो स्वीकार आपणास गरज म्हणून करायचा असून आधुनिक काळातील कौशल्य ,शिक्षण पद्धती ,अभ्यास करण्याच्या पद्धती या सर्व काही बदललेले आहेत. पूर्वीच्या काळी शाळेत घोकंपट्टी करून  घेतली जायची आज तशी आवश्यकता नाही .


आजचे शिक्षण हे विद्यार्थ्यांना आधुनिक काळात जगण्यासाठी लागणारे जीवन कौशल्य ,सामाजिक भान, संस्कार मूल्य या सर्व गोष्टींचा समावेश करावाच लागेल आणि हे सर्व आपणास घरात राहूनच मुलांना द्यावे लागेल .यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांशी ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून संपर्क साधून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात परंतु पालकांची ही मोठ्या जबाबदारी विद्यार्थ्यांना विविध कृती व उपक्रम खेळ गाणी गोष्टी गप्पा या माध्यमातून शिक्षण दिले पाहिजे. यामध्ये  मुलांच्या कलेप्रमाणे त्यांना शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर मुलांनाही आधुनिक साधनांच्या साह्याने स्वयंअध्ययनाची सवय लावून स्वतःच्या स्वतः शिक्षण घेतले पाहिजे आणि हे सर्व आज सुरू आहे.


 संधीचे सोने करणे

 मित्रांनो आज आपणास उत्तम संधी उपलब्ध झाले आहे. तिच्या माध्यमातून आपणास विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांच्या द्वारे आधुनिक शिक्षण घेता येईल .यामध्ये शिक्षण घेण्याची  पद्धत बदललेले आहे .सर्वप्रथम मुलांना स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून शिक्षण घेता यायला पाहिजे आणि त्यासाठीच कौशल्य मुलांमध्ये कसं निर्माण होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागतील 
त्यामुळे शिक्षक पालक शाळा संस्था या सर्वांना एकजूट होऊन मुलं स्वयंअध्ययन कसे करू शकतील यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करावे लागतील. यामध्ये विविध माध्यमांचा सहभाग घ्यावा लागेल .


ऑनलाइन शिक्षण 


मुलांचे ऑनलाईन शिक्षण जगभरामध्ये ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना घरामध्ये स्मार्टफोन ,अँड्रॉइड फोन ,लॅपटॉप किंवा संगणक  आणि इंटरनेटची सुविधा असेल अशा मुलांपर्यंत शिक्षक झूम ॲप ,गूगल मीट अशा वेबिनारच्या साह्याने मुलांशी संवाद साधत आहेत आणि हा उत्तम प्लॅटफॉर्म मुलांना निर्माण झालेला आहे .हा बदल आपणा सर्वांना स्वीकारावेच लागेल .

या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे विविध प्रकारच्या पुस्तके, कृती ,खेळ ,उपक्रम या संदर्भातील साहित्य.
 युट्युब, विविध प्रकारच्या एप्लिकेशन्स ,त्यामध्ये'  दीक्षा ॲप', ' रीड अलोंग 'असेल या माध्यमातून मुलांचं इंग्रजी मराठी आणि इतर भाषा यामध्ये असणाऱ्या गोष्टी खेळ कृती यामधून मुलांचं भाषा विकास होणार आहे .

त्याचबरोबर प्रत्येक इयत्ता साठी लागणारी ऍप्लिकेशन्स त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले दीक्षा ॲप याचा प्रभावी वापर सर्वांनी केला पाहिजे.व्हिडिओ, ऑनलाइन टेस्ट हे आपणास प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घेता येतील आणि त्याद्वारे ही मुलं स्वतःचं स्वतः शिकतील.
ऑनलाइन शिक्षणाचे प्लॅटफॉर्म

 त्याचबरोबर ' गुगल '  हा मुलांसाठी चा सर्वात जवळचा माहिती स्त्रोत आहे. यामध्ये आपणास विविध प्रकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून मुलांना कृती खेळ उपक्रम देता येतील. ज्यावेळी मुलांना काही अडचणी येतील त्या त्या वेळेस माहितीचा स्रोत म्हणून गुगल कडे मुलं सर्च करतील . यावेळी गूगल हा सर्वांना माहिती पुरवणार स्त्रोत असेल. प्रत्येक वेळेला शिक्षक-पालक यांची मदत न घेता इंटरनेटच्या साह्याने माहितीचे भांडार मुलांसमोर उघड झाले असेल.

  शिक्षक-पालक ,घरातील मोठे या सर्वांना मुलांचे शिकणे कसे घडेल यासाठी आपणास प्रेरणा निर्माण करावे लागतील .यामध्ये मुलांना शिक्षा करणे, रागावणे ,ओरडणे ,अभ्यासाला बस असे न करता मुल स्वतःचे स्वतः कसा शिकेल शिकेल यासाठी कृती, उपक्रम ,खेळ  ,गप्पागोष्टी, गाणी ,व्हिडिओ ,मीटिंग ,संवाद या माध्यमातून शिक्षण देता येईल .प्राथमिक मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांनी मुलांना मदत म्हणून काम करावे .मात्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये मुलांनी स्वतःच्या स्वतः स्वयंअध्ययन करणे गरजेचे आहे. 

यामध्ये काही त्रुटी ही राहू शकतात.जर प्राथमिक वर्गांमधील मुलांना पालकांनी सर्व गोष्टी केल्या तर मुलगा हा काठीचा आधार म्हणून आपल्याकडे प्रत्येक वेळा पाहतील. जर मुलांना स्वतः प्रत्येक गोष्टी कृती गाणे गप्पा स्वयंअध्ययन करण्याची संधी दिल्या तर तो स्वतः उभारी घेईल .

ऑफलाइन शिक्षण 


ऑफलाइन शिक्षणामध्ये ज्या मुलांकडे अँड्रॉइड फोन नाहीत किंवा इंटरनेट नाही अशा मुलांचे शिक्षण . ही मुलं सुद्धा शिकताहेत आणि ती जास्त स्वयंप्रेरणेने शिकत आहेत .कारण ज्या वेळी अडचणी निर्माण होतात तेव्हा माणूस स्वतः मार्ग काढतो. हा माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि अशा काळामध्ये  मुलांशी  शिक्षक कॉन्फरन्स कॉल द्वारे संवाद साधतात .

विविध कृती खेळ , अभ्यास  टेक्स्ट मेसेज द्वारे मुलांपर्यंत पोहोचवत असतात . यामध्ये मोठा भाऊ बहिण घरातील आई-वडील यांनी मुलांना मदत करणे . तसेच आपल्या शाळेतील मोठ्या वर्गातील  विषय मित्र  किंवा अभ्यास मित्र  अशा मुलांच्या माध्यमातून  सामाजिक अंतर राखून  मुलांचे शिक्षण या माध्यमातून सुरू राहील यासाठी प्रयत्न करावेत .

उपक्रम कृती व खेळ


त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभागाने ' टिलीमिली ' या कार्यक्रमातून टीव्ही च्या द्वारे मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिले आहे . त्याचबरोबर जिओ चॅनल च्या माध्यमातून  संपूर्ण पाठ्यक्रम  उपलब्ध करून दिला आहे .याचा सर्वांनी लाभ घ्यावा .त्याचबरोबर वर्तमानपत्रे ,जुनी मासिके, पुस्तके ,स्वाध्याय पुस्तिका ,कृतीपत्रिका या साहित्याच्या माध्यमातून मुलांना जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे आणि साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजेत. 

पाठ्यपुस्तकांमध्ये असणारे उपक्रम ,खेळ, कृती यांचा आधार घेऊन मुलांनी स्वतः त्या कृती कराव्यात आणि याद्वारेही मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरू राहील. म्हणजेच कोणीही मुल शिकणार नाही असं होणार नाही परंतु प्रत्येकाची शिकण्याची गती ही वेगळी राहणार आहे.

 यामध्ये शासन विविध पातळ्यांवर काम करत आहेत. त्याच बरोबर शिक्षक ,शाळा ,पालक ,संस्था हे सर्व आपापल्या परीने मदत करत आहेत . मुलांचे ऑफलाइन शिक्षण ऑनलाइन  कसे करता येईल या संदर्भात सेवाभावी संस्था ,मंडळे, दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन मुलांचे शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे गतीने कसे करता येईल यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि म्हणूनच संधी स्वीकारून आपल्या जीवनपद्धतीत बदल घडवून आणून योग्य प्रेरणेने काम केले तर मुलांचे शिक्षण कोणीही अडवू शकत नाही .

आजच्या कोरोना काळामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये मोलाचा वाटा असणारे पालक, मोठे बहिण- भाऊ ,कुटुंब यांना खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर सर्व मुलांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी धडपडणारे सर्व शिक्षक ,शाळा ,संस्था ,शासन यांनाही खूप खूप धन्यवाद . 

सामाजिक अंतर राखा. 
घरात सुरक्षित रहा .


सचिन बाजीराव माने 
आरफळ सातारा
sachinmane0383@gmail.com 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या