करियरचा मार्ग निवडण्यापूर्वी.........

शिक्षण शाळा ते करिअर 


पालक आणि सर्वांसाठी

करियरचा मार्ग निवडण्यापूर्वी.........मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल लागला आणि सर्व घरांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की नक्की ऍडमिशन कुठे घ्यावे ? 
 आपल्या मुलाने कोणते करिअर निवडावे?
 कुठे चांगली  संधी आहेत?
 याची चर्चा सुरू झाली.


 मित्रांनो आपणा सर्वांनाच माहिती आहे की दहावी बारावी नंतरचे शिक्षण मुलांच्या आयुष्याला वळण देणारे ठरतं आणि या आयुष्याला वळण देणाऱ्या गोष्टी  ठरवण्यापूर्वी  नक्की काय करावे  याचाही आपण विचार करावा .


दहावी-बारावीनंतर आपल्या मुलांनी काय निवडावे, कोणत्या क्षेत्रात जावे ,नोकरीच्या संधी कोठे आहेत ? त्यासाठीच शिक्षण कोणते घ्यावं ,डिग्री करावी का डिप्लोमा घ्यावा, पटकन नोकरी कशी लागेल असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.

 परंतु दहावीनंतर सर्व पालकांच्या इच्छा असते की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावे ,इंजिनियर व्हावे, वकील व्हावे आणि यासाठीच आपण मुलांना विज्ञान साठी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ढकलून देतो ,जर विज्ञान शाखेत नंबर नाही लागला तर वाणिज्य शाखा निवडतो आणि जर सर्वसामान्य बुद्धीचा मुलगा असेल तर त्याला आपण कला शाखेत ऍडमिशन घ्यायला सांगतो.

 यामध्ये आपण मुलांची कौशल्य, क्षमता, त्याची आवड ,भविष्यातील संधी, नोकरी की व्यवसाय या एकाही गोष्टीचा विचार न करता फक्त गुणांच्या आधारावर ती मुलांना विविध शाखांमध्ये ढकलून देतो आणि मग मुलाला माहीतच नसतं की मी नक्की काय कराव !!! मुलाला फक्त एवढच सांगतात कि तुला आता ज्या शाखेत मी पाठवले त्या शाखेत फक्त आणि फक्त यश मिळवायच आहे आणि अश्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये काही मुल अडखळतात ,पडतात, चालतात काही ठराविक मुले  पळतात . आणि काही स्पर्धा सोडून बाहेरही निघून जातात. परंतु सर्वच मुले त्या क्षेत्रामध्ये अग्रेसर होत नाहीत .
 मग जे आयुष्यात वळण देणारी वर्ष मुलांच्या हातून निसटून जातात याला जबाबदार कोण पालक ? शिक्षक ? का स्वतः ते मुल ?


मित्रांनो आपण सहजच दुसऱ्यास म्हणतो ," मी तुला चांगलाच ओळखतो."
 परंतु आपण नेहमी दुसऱ्याला चांगल ओळखण्यापेक्षा स्वतःला कधी ओळखणार ?
पालकांनी आपल्या मुलांना ओळखल का आणि मुलांनी तरी स्वतःला ओळखलेल आहे का ?
स्वतःला ओळखा


स्वतःला ओळखा 

आता स्वतःला ओळखणे यामध्ये आपल्या अंगी असणारी कौशल्य क्षमता आवड आपणास समजली पाहिजे यासाठी सर्वप्रथम मुलांनी स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे. आता स्वतःला ओळखायचे म्हणजे काय ?तर माझ्या मध्ये कोणत्या शारीरिक क्षमता चांगले आहेत?  कोणत्या बौद्धिक क्षमता चांगले आहेत ?मी गणितामध्ये पुढे आहे किंवा विज्ञान विषयात आवड आहे ? फोटोग्राफीचा करायला आवडतं  की मला सुंदर चित्र काढता येते?

मला विविध प्रकारच्या वस्तू बनवता येतात कि मला चांगले खाद्य पदार्थ बनवता येतात?
 का मला फॅशन डिझाईनिंग करायचा आहे?
 सर्वप्रथम स्वतःमध्ये अंगी असणारे क्षमता ओळखायला शिका .ज्यावेळी आपण स्वतःतील क्षमता ओळखायला शिकू त्यानंतरच आपण कोणत्या क्षेत्रात जायला हवे हे आपल्याला ठरवता येईल.

 मित्रांनो या आधीच्या भागांमध्ये आपण अनेक उदाहरणं पाहिली  . याआधीचे लेख नक्की वाचा . त्यामध्ये आपणास विविध बुद्धिमत्ता त्यांचे प्रकार  दिलेले आहेत आणि आपल्या मुलांमध्ये कोणत्या क्षमता कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्या आपणास ओळखता येईल.

          सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांनी  त्याला क्रिकेटची आवड पाहून  त्या क्षेत्रामध्ये  करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली  .मित्रांनो सचिन तेंडुलकर बारावी इंग्रजी विषयात नापास आहे परंतु ध्येय जिद्द चिकाटी आवड याच्या बळावर क्रिकेट क्षेत्रातील देव  बनला.  सचिन तेंडुलकरचा धडा बारावीच्या इंग्रजी  पुस्तक आता आलेला आहे आणि म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांमधील असणारी आवड क्षमता कौशल्य ओळखूनच त्यानंतर करिअरच्या संधी निवडाव्यात .

ध्येय ठरवा 

 एकदा का आपण स्वतःला ओळखलं की मला कोणती ध्येय गाठायचे हेही ठरवता यायला पाहिजे .आपणा सर्वांना माहीतच आहे अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसला .असा आपल्या प्रत्येकातील अर्जुनाला आपण निश्चित केलेले ध्येय दिसले पाहिजे . एकदा का आपण ध्येय ठरवले की निम्मे काम यशस्वी झाले .
ध्येय ठरवा

ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कोणत्या शाखेत जावे लागेल ? कोणते शिक्षण घ्यावे लागेल ? त्यासाठीचे कोणत्या संधी आहेत हे पाहावे लागेल आणि गाठण्यासाठी अपार मेहनत जिद्द चिकाटी कष्ट करावेच लागतील या सर्व संधी आपणास निश्चितच उपलब्ध होतात .


भविष्यातील संधी ओळखा 

मित्रांनो  आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये  कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रवेश केलेला आहे  अशा काळामध्ये  अनेक काम  ही तंत्रज्ञानाच्या साह्याने केली जातात  या काळामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठी  भरारी  ची संधी  आपणा सर्वांना उपलब्ध झालेले आहे .
कृत्रिम बुद्धिमत्ता

त्याचबरोबर शारीरिक क्षमता असणाऱ्या मुलांमध्ये  खेळाच्या विकासातून खूप मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत . व्यावसायिक कौशल्य  आणि विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्याचबरोबर आज ऑनलाइनच्या युगामध्ये डिजिटल मार्केटिंग , ऑनलाइन मार्केटिंग ,गेम्स या क्षेत्रातील संधी या सर्वांचा विचार करावा.

गरुड भरारी


स्वतःला ओळखून ध्येय ठरवून आपल्या आवड क्षमता कौशल्य यांच्या बळावर प्रयत्नां च्या पंखांनी आयुष्यभर उंच गरुड भरारी घ्या.
 पुढील भागात आपण दहावीनंतर असणाऱ्या करिअरच्या संधी पाहणार आहोत.

 क्रमशः

 सचिन बाजीराव माने

 आरफळ सातारा.

sachinmane0383@gmail.com 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

प्रेरणा म्हणाले…
करीअर मार्गदर्शन खूप छान केलत.विविध टप्प्यांनुसार मार्गदर्शन झाले.मनःपूर्वक धन्यवाद..!!