शिक्षण शाळा ते करिअर
खेळातून शिक्षण भाग 1
मराठी
1) जिभेची वळकटी
उद्देश: स्पष्ट व स्वच्छ उच्चार करता येणे
कृती :
हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल .
खालीलपैकी कुठलाही एक शब्दसमूह घ्यावा.
प्रत्येकाने तो न अडखळता व न थांबता म्हणावा.
जो अडखळेल तो बाद होईल, न अडखळता जास्त वेळ म्हणू शकेल तो जिंकेल.
तुम्हीसुद्धा नव्याने शब्दसमूह तयार करा.
1) चटईला टाचणी टोचली.
2) कच्ची पपई पक्की पपई.
3) काळे कावळे गोरे बगळे.
4) मोठं नाण लहान नाण.
5) कच्चा पापड पक्का पापड
6) काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले.
गणित
लांब आखूड
उद्देश लांब आखूड या संकल्पना समजणे
कृती
कोणत्याही वस्तूंच्या लांबीच्या आकारावरून ती लांब आहे का आखूड आहे हे ओळखता येते.
आज काल मुले घरीच आहेत तरी घराभोवती किंवा शेतामध्ये हे जर कुंपण केले असेल किंवा छपरासाठीच्या ताट्या बनवले असतील तर त्यामध्ये मुलांना आडवी काठी आणि उभी काठी यांच्या लांबी वरून कोणती काठी लांब आहे आणि कोणती काठी आखूड आहे हे मुलांना ओळखायला सांगणे.
तसेच दप्तरामध्ये असणारे विविध वस्तू दोन पेन्सिल्स त्यामध्ये आखूड पेन्सिल कोणते आणि लांब कोणते .
त्याचप्रमाणे दप्तरातील इतर वस्तू, किचन मधील वस्तू यांचा लांब आखूड असा खेळ घेणे .
यामध्ये मुलांनी लांब असणाऱ्या वस्तू ओळखाव्यात आखूड असणाऱ्या वस्तू ओळखाव्यात.
इंग्रजी
चला शिकूया व्यंजनांचे आवाज
व्यंजनांचे आवाज
B चा आवाज ब
D चा आवाज ड
F आवाज फ
J चा आवाज ज
K चा आवाज क
L चा आवाज ल
M चा आवाज म
N चा आवाज न
P चा आवाज प
R चा आवाज र
S चा आवाज स
T चा आवाज ट
V चा आवाज व
X चा आवाज एक्स
Z चा आवाज ज/ झ
या सर्व इंग्रजी व्यंजनामध्ये हे त्यांच्या नावातच त्यांचा आवाज लपलेला आहे
त्यामुळे हे आवाज लक्षात ठेवणे मुलांना सोपे जाईल.
मुलांनी इंग्रजी व्यंजने सांगा किंवा लिहा व त्यांच्या नावातच लपलेले आवाजही लिहा किंवा सांगा.
3 टिप्पण्या
It is really good way to learn from your simple but innovative ideas.
Yes I can
Kumar kamble