शिक्षण : शाळा ते करियर
पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी
https://www.educationschooltocareer.com/2020/10/1.html
खेळातून शिक्षण भाग-3
मित्रांनो दररोज आपण प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी दररोज नवीन खेळ व कृतीतून मराठी गणित आणि इंग्रजी विषयांची विविध कौशल्य शिकणार आहोत.
मराठी
अडथळ्यांची शर्यत
उद्देश : व्यंजनांना स्वरचिन्ह लावून शब्द तयार करणे .
कृती : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल.
वेळ दहा मिनिटे .
दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्द तयार करून घ्यावेत.
ज्या स्वरचिन्ह समवेत अर्थपूर्ण शब्द होत नसेल त्या ठिकाणी फुली द्यावी व पुढे जावे .
मात्र दुसऱ्या अक्षरांत बदल करू नये.
उदाहरणार्थ.
कर- कार- किर- कीर- × - × - केर -×- कोर- × - × -
1 ) कर 2) नर 3 ) पळ 4 ) मन 5) लट 6 ) कस
यांसारखे आणखी शब्द घेऊन अडथळ्यांची शर्यत पार करा.
गणित
रुंद अरुंद
उद्देश : रुंद अरुंद संकल्पना समजणे.
कृती: रस्त्याने जात असताना विविध आकाराचे बोर्ड आपणास पहावयास मिळतात .
त्यापैकीच एक बोर्ड असतो ज्या ठिकाणी पूल असतो रस्त्यावर तेथे बोर्ड असतो .
' पुढे अरुंद पूल आहे ,सावकाश वाहने चालवा'
म्हणजेच या ठिकाणी रस्ता हा लांबीने जास्त असल्यामुळे रस्ता हा रुंद आहे. तर रस्त्याच्या मानाने पुलाची लांबी कमी असते आणि म्हणून पूल हा रस्ता पेक्षा अरुंद असतो.
यावरून रस्ता रुंद तर पूल अरुंद आहे .
याचप्रमाणे मुलांनी दोन घरांमध्ये असणारा जाण्याचा रस्ता आणि घरासमोरील मुख्य रस्ता यांपैकी कोणता रस्ता रुंद आणि कोणता रस्ता अरुंद हे ओळखा.
त्याचप्रमाणे दप्तरात असणाऱ्या विविध वस्तू,
घरातील विविध वस्तू ,
दोन झाडांतील अंतर
दरवाजा - गेट ,
शेतात जाणारा रस्ता आणि गावातील रस्ता
अशा विविध वस्तू पाहून रुंद आणि अरुंद कोण ते ओळखा.
इंग्रजी
स्वरांचा पहिला आवाज
इंग्रजी भाषेमध्ये पाच स्वर आहेत बहुतेक शब्दांत किमान एक स्वर किंवा स्वरा चा आवाज तरी येतोच जर आपल्याला स्वरांचे आवाज व्यवस्थित लक्षात राहिले नाही तर इंग्रजी भाषा वाचताना आपण चुकू शकतो आणि म्हणून आपल्याला स्वरांचे आवाज अचूक लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Aa चा आवाज ॲ
Ee चा आवाज ए
Ii चा आवाज इ
Oo चा आवाज ऑ
Uu चा आवाज अ
इंग्रजीतील हे स्वर खूप महत्त्वाचे अक्षरे आहेत .त्यांचा आवाज नक्की लक्षात ठेवा .
यासाठी इंग्रजी स्वरांचे कार्डशिट वर किंवा पुठ्ठ्यावर आकार कापा व त्याखाली त्यांचे आवाज लिहा व लक्षात ठेवा.
https://www.educationschooltocareer.com/2020/10/2.html
क्रमशः
सचिन बाजीराव माने .
आरफळ सातारा.
1 टिप्पण्या
खुप छान