खेळातून शिक्षण भाग- 6

 शिक्षण : शाळा ते करियर

पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यासाठी

https://www.educationschooltocareer.com/2020/10/4.html


खेळातून शिक्षण भाग- 6

             मित्रांनो दररोज आपण प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी दररोज नवीन खेळ व कृतीतून मराठी गणित आणि इंग्रजी विषयांची विविध कौशल्य शिकणार आहोत.

मराठी 

स्वर चिन्हांची गाडी


उद्देश : दिलेल्या अक्षरांना वेगवेगळी स्वरचिन्हे लावून जास्तीत जास्त शब्द तयार करणे 

कृती: हा खेळ एक किंवा जास्त मुले खेळू शकतील .

वेळ पाच मिनिटे .

प्रत्येक अक्षर जोडीसाठी जास्तीत जास्त शब्द तयार करा .

☯️ उदाहरणार्थ : 

अक्षर जोडी - ख ड 

या अक्षर जोडीला  वेगवेगळी स्वरचिन्हे लावून  तयार केलेली गाडी - 

खडा ➡️ खाडी ➡️ खेडी ➡️ खडू ➡️ खंडू  ➡️ खडे ➡️ खांड ➡️ खेडे ➡️ खुडा ➡️ खाडा ➡️ डेख ➡️ डंख .

खालील अक्षर जोड्यांना स्वरचिन्ह लावून गाडी तयार करा.

1) व ,र          2)ग, र        3) त ,प

4 ) प , ल       5 ) स , र


सर्वांचा मित्र कोण या खेळातील उत्तरे

1) डी 

2) र

3) ट 

4) ण 


गणित

आठवड्याचे वार

उद्देश -वारांची नावे माहित करणे

कृती :  मुलांसोबत गप्पा मारा.

☯️ आज काल उद्या यावर गप्पा मारणे, म्हणजे आज आहे दसरा ,आज वार आहे रविवार.

☯️ काल नवरात्रीतील देवीचे उपवास संपले. काल आईने आपल्या साठी खायला काय बनवले ?

: धपाटी आणि कडाकण्या .

: काल वार कोणता होता ? 

:  शनिवार.

☯️ आपल्या गावात मंदिर कोणत्या देवाचे आहे ? - महादेवाचे आपल्या घरात आजोबांचा उपवास कोणत्या दिवशी असतो?

:  सोमवारी

☯️ याप्रमाणे मुलांना प्रश्न विचारावेत.

 सकाळची शाळा कोणत्या वारी असते ? 

शाळेला सुट्टी कोणत्या वारी असते ?

दत्ताचा वार कोणता ?

आठवड्याचा बाजार कोणत्या वारी असतो?

 देवीचा वार कोणता?

 गणपतीचा वार कोणता ?

हनुमानाचा वार कोणता?

 ☯️ याप्रमाणे वार विचारून एका कार्डशिट वर वार आणि विशेष दिवस लिहावे. 

उदाहरणार्थ :  

सोमवार -शंभू महादेवाचा वार. 

मंगळवार -देवीचा उपवास .

बुधवार -आठवड्याचा बाजार.

 गुरुवार -दत्ताचा वार .

शुक्रवार -महालक्ष्मीचा .

शनिवार- अर्धी शाळा .

रविवार- सुट्टी.

☯️वारांचे गाणे

वार सुटीचा पहिला  आला

म्हणती रविवार

चंद्रावरुनी   नाव  दुजाला दिले सोमवार

तिसरा आला वार देवीचा तो मंगळवार   

चवथा आला विठोबाचा तोचि बुधवार

दत्तगुरूंचा वार पाचवा म्हणती गुरुवार

खात फुटाणे तोचि सहावा वार शुक्रवार

सुटी  दुपारी मिळे  शाळेला आला शनिवार

हासत  खेळत आठवड्याचे जाती सात वार   

☯️ त्याचबरोबर आपणा सर्वांना आठवते ते लहानपणीचे गाणे

    आजी चा उपवास सोमवार
ताईची मंगळागौर मंगलवार
बुध-बृहस्पती बुधवार
दत्ताला पेढे गुरुवार
चणे-फुटाणे शुक्रवार
अर्धी शाळा शनिवार
शाळेला सुट्टी रविवार 

असे आठवड्याच्या वारांचे गाणे तयार करा.


इंग्रजी

उद्देश:  स्वर  e  ला व्यंजनांची जोडल्यावर बनणारे आवाज .

कृती: तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला एका व्यंजनाला स्वर जोडल्यावर त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते माहीत असणे जरुरीचे आहे. चला तर आज आपण e  हा स्वर वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यावर त्या दोन अक्षरांचा आवाज काय होते ते शिकूया .

 उदाहरणार्थ: D  चा आवाज  ड  + e  चा  आवाज ए  = डे 


D + e  चा आवाज डे 

F e = फे                  Je = जे               Ke = के 

Le = ले                   Ne = ने              Pe = पे 

Re = रे                   Se = से               Te = टे 

Ve = वे                   Ye= ये                Ze = जे 

याप्रमाणे उच्चार लक्षात ठेवावेत.


खालील लिंक ला टच करा व मागील भाग वाचा.

https://www.educationschooltocareer.com/2020/10/5.html
क्रमशः

सचिन बाजीराव माने

 आरफळ सातारा

sachinmane0383@gmail.com
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या