शिक्षण : शाळा ते करियर
पालक शिक्षक आणि विद्यार्थी
https://www.educationschooltocareer.com/2020/10/6.html
खेळातून शिक्षण भाग- 8
मित्रांनो दररोज आपण प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी दररोज नवीन खेळ व कृतीतून मराठी गणित आणि इंग्रजी विषयांची विविध कौशल्य शिकणार आहोत.
🦚 मराठी 🦚
फुलदाणी
उद्देश : दिलेले शब्दांमधून एक अक्षरी दोन अक्षरी आणि तीन अक्षरी शब्द शोधणे.
कृती:
हा खेळ एक किंवा एकापेक्षा जास्त मुले खेळू शकतील.
प्रत्येक शब्द एक पुष्पगुच्छ आहे असे समजा त्या गुच्छातून पुढे दिलेल्या सूचनेनुसार फुले शोधा व त्यांना फुलदाणीत सजवा .
☯️ उदाहरणार्थ : देश या शब्दात दे हा एक अक्षरी शब्द आहे.
असेच खाली दिलेल्या शब्दांवरून एक अक्षरी दोन अक्षरी आणि तीन अक्षरी शब्द शोधा.
1️⃣ खेळ एक : एक अक्षरी शब्द शोधा.
माती तोकडा खादाड नेता जोर जाण प्रयोग हार पैसे मऊ भूमिती खवा देव घेवडा तूप
2️⃣ खेळ दोन : दोन अक्षरी शब्द शोधा.
जेवण जंगल मंगळ प्रपंच भेसूर सुंदर तडफ भूगोल पिंपळ बाभूळ पोफळी खजूर गजरा कमळ सुपारी सायली नाटक वजन प्रभात
3️⃣ खेळ तीन: तीन अक्षरी शब्द शोधा .
कसरत प्रचारक सुंदरता प्रभाकर चिमुरडा गोदावरी खोलगट काळवीट एकाएकी चाकवत जागरण ओवाळणे मजेशीर समाधान विनायक अवघड लागवण कनवाळू करवट परिसर
अशा प्रकारे आणखी शब्द घेऊन त्यातून एक अक्षरी दोन अक्षरी तीन अक्षरी शब्द शोधा व फुलदाणी सजवा.
याची उत्तरे पुढील भागात मिळतील.
गणित.
पटपट सांगा
उद्देश : मोजणं ,दशक ,ज्यादा, कमी ,आधी ,नंतर ,तुलना, दहा बनवण्यासाठी आणखी किती ?,एका संचात किती घटक ?,बेरीज ,वजाबाकी याबद्दल माहिती घेणे.
कृती : वरील चित्र फळ्याचे निरीक्षण करा आणि प्रश्न विचारा.
1️⃣ प्रत्येक सशाला छत्री मिळेल?
2️⃣ प्रत्येक सशाला तारा मिळेल ?
3️⃣ किती झेंडे आहेत ?
4️⃣ पहिले जहाज दाखवा .
5️⃣ तारे मोजा त्यापेक्षा दोनने अधिक घटक असणारा संच सांगा.
6️⃣ झेंडे आणि वर्तुळे एकास एक जोडा एकूण किती झाले?
7️⃣ वर्तुळ आणि त्रिकोण जोडा एकास एक संगतीने किती झाले?
8️⃣एकूण त्रिकोणांची संख्या सांगण्याचा एखादा मार्ग सांगा .
9️⃣समजा आणखी तीन त्रिकोण असले तर?
1️⃣0️⃣ झाडांपेक्षा फुल कितीने कमी ?
1️⃣1️⃣ पानांपेक्षा झाडे कितीने जास्त?
1️⃣2️⃣ सर्वात कमी कोणत्या वस्तू आहेत ?
1️⃣3️⃣ सर्वात जास्त वस्तू कोणत्या आहेत?
1️⃣4️⃣ रिकाम्या जागा भरा.
पाने 5 + = 10
छत्र्या 6 + =10
झेंडे 10 + =10
जहाजे 2 + =10
10 - = 9 त्रिकोण
10 - = 5 तारे
10 - = 7 झाडे
असे विविध प्रश्न विचारावेत.
इंग्रजी
स्वर i ला व्यंजनांशी जोडल्यावर बनणारा आवाज.
कृती: तीन अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला एका व्यंजनाला स्वर जोडल्यावर त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतं ते माहित असणे जरुरीचे आहे. चला आता आपण स्वर i हा वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यावर त्या दोन अक्षरांचा आवाज काय होतो ते शिकू या.
उदाहरण:
B + i =
ब + इ = बि
D i चा आवाज डि
Fi चा आवाज फि
Gi चा आवाज गि
Hi चा आवाज हि
Ji चा आवाज जि
Ki चा आवाज कि
Li चा आवाज लि
Mi चा आवाज मि
Ni चा आवाज नि
Pi चा आवाज पि
Ri चा आवाज रि
Si चा आवाज सि
Ti चा आवाज टि
Vi चा आवाज वि
Wi चा आवाज वि
Yi चा आवाज यि
Zi चा आवाज जि
याप्रमाणे वाचन करा.
मागील भाग पुन्हा वाचण्यासाठी खालील लिंकला टच करा.
क्रमशः
सचिन बाजीराव माने
आरफळ सातारा
1 टिप्पण्या
नवनवीन कल्पना आणि खेळ