इस्टोनियन शिक्षण व्यवस्थेची यशोगाथा इस्टोनियन शिक्षणव्यवस्थेची यशोगाथा

इस्टोनियन शिक्षणव्यवस्था खालील 5 टप्प्यांवर आधारित आहे
 पूर्व प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षण
माध्यमिक शिक्षण
होकेशनल शिक्षण
उच्च शिक्षण


शिशुवर्गासाठीचे शिक्षण

इस्टोनियामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण हे मुलाच्या अठराव्या महिन्यापासून ते सात वर्ष वयापर्यंत असतं. यामध्ये  दीड वर्षे वयाच्या मुलाला दररोजच्या कृती, गोष्टी यांचे शिक्षण दिले जाते.
 तर तीन ते सात वर्षे वयोगटातील मुले ही शिशु वर्गाचे शिक्षण घेत असतात .

  इस्टोनिया मध्ये सक्तीचे शिक्षण हे सात वर्षे वयोगटातील पासून सुरू होते

 पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी 93% शाळा या सरकारी आहेत तर फक्त सात टक्के शाळा या खाजगी आहेत.शिशु वर्गासाठी माफक फी व मुलांच्या जेवणाचा खर्च हा पालकांना करावा लागतो. याउलट खाजगी शिष्यवर्ग साठी भरपूर फी व खूप सार्‍या शर्ती ठेवलेले आहेत

पिसा 2015 च्या परीक्षा मध्ये एस्टोनिया देशातील विद्यार्थी विज्ञानामध्ये प्रथम क्रमांकावर ,गणितात द्वितीय क्रमांकावर तर मूलभूत वाचन यामध्ये तृतीय क्रमांकावर आहेत तर युरोपातील सर्वात प्रथम क्रमांकाचा देश हा एस्टोनिया आहे.

शिक्षक

 या देशांमध्ये महिला शिक्षिकांचे प्रमाण जास्त असून येथील शिक्षक हे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान पोहोचवण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करतात. ते खूप व्यवसायिक असतात व आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतात . इस्टोनिया अभ्यासक्रमामध्ये सामान्य उद्दिष्टे आणि अध्ययन निष्पत्ती फक्त स्पष्ट केलेले आहे. मात्र अध्ययन निष्पत्ती सर्व विद्यार्थ्यांमध्ये परिपूर्ण येण्यासाठी येथील शिक्षक हे सर्व मार्गांचा अवलंब करून विद्यार्थ्यांपर्यंत अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये शिक्षकांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे. माध्यमिक शिक्षण

माध्यमिक शिक्षणाचा पाया हा मूलभूत शिक्षण आणि सामान्य माध्यमिक शिक्षण यावर आधारित आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण तीन वर्षासाठी असते. दहावी ते बारावी अशी शिक्षण मिळते .यासाठी मात्र राज्यपातळीवरील परीक्षा पास व्हावे लागते. त्याचबरोबर शाळेची परीक्षा आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेले कृती संशोधन किंवा प्रात्यक्षिक परीक्षा यांवरच पुढील प्रवेश मिळतो

व्यवसायिक शिक्षण

व्यवसाय शिक्षण यामध्ये विद्यार्थ्यांनी मूलभूत शिक्षणाची नऊ वर्षे पूर्ण केलेले आहेत. त्यांना व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळतो .हे शिक्षण कोणीही विद्यार्थी कधीही शिक्षण घेऊ शकतो.

उच्च शिक्षण

इस्टोनियामध्ये उच्चशिक्षणाच्या दोन स्वतंत्र शाखा आहेत. त्यामध्ये शैक्षणिक विद्याशाखा आणि अनुभविक उच्च शिक्षण विद्याशाखा यांचा समावेश होतो .शैक्षणिक विद्याशाखांमध्ये बॅचलर स्टडी ,मास्टर स्टडी आणि डॉक्टर स्टडी हे तीन भाग आहेत.
उच्च शिक्षण हे सरकारी विद्यापीठांमध्ये मोफत असून डिजिटल माध्यमांचा पुरेपूर वापर केलेला आहे .यामध्ये पालक शिक्षक आणि विद्यार्थी हे तिन्ही डिजिटल माध्यमांद्वारे एकत्र जोडलेले असतात.

 ' जीवनभर शिक्षण '

इस्टोनियन शिक्षण व्यवस्थेचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे की इस्टोनियन सरकारने 2020 मध्ये इस्टोनियामध्ये राहणाऱ्या सर्वांसाठीच ' जीवनभर शिक्षण ' यासाठीचा कार्यक्रम तयार केलेला असून यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये गरजेनुसार कौशल्य आणि त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी विशेष असा शिक्षण पद्धतीचा विकास आराखडा केलेला आहे .


22 व्या शतकामध्ये जगत असताना तंत्रज्ञानाने खूप मोठी भरारी घेतलेली आहे ,परंतु आज शिकलेले तंत्रज्ञान भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही आणि म्हणून त्या दृष्टीने  मुलांनी घेतलेली कौशल्य भविष्यात उपयोगी पडणार नाहीत  ,भविष्यामध्ये येणारे तंत्रज्ञान  आणि त्यासाठीची कौशल्य  सर्वांनाच यावीत यासाठी  जीवनभर शिक्षण  इस्टोनियन सरकारनेच यासाठी योजना केली .


आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी क्षमतांचा विकास करत आयुष्यभरासाठीची शिक्षण व्यवस्था इस्टोनियन सरकारने निर्माण केली आहे .त्यामध्ये विद्यार्थी ,पालक आणि सर्व नागरिक शिक्षण घेताना दिसतात.

 इस्टोनिया शिक्षण व्यवस्थेची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये


शिक्षकांना 60 टक्के पर्यंत पगारवाढ त्यांच्या परफॉर्मन्सवर देणारा एकमेव देश !

सर्व विद्यार्थ्यांना गरमागरम मोफत जेवण यामुळे गरीब श्रीमंती भेद कमी होऊन मुलांचे पूर्ण लक्ष अभ्यासात राहील यासाठी दिले जाते.

 मोफत पाठ्यपुस्तके ,डिजिटल पाठ्यपुस्तके तसेच कृतिपुस्तिका आणि मोफत वाहतूक देणारे जगातील एकमेव देश.

सर्व शाळांमध्ये एक विशिष्ट प्रकारची वेळ खेळासाठी ठेवलेले असते यावेळी मध्ये सर्व विद्यार्थी खेळ खेळतात ही एक विशेष बाब दिसून येते. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठीच ही वेळ निश्चित केले आहे.

शाळा फक्त अर्ध वेळासाठी भरते. मुले  घरी न जाता आपला अभ्यास, विविध कृती ,अभ्यासक्रमातील कृती या शाळा सुटल्यानंतर तिथेच बसून पूर्ण करतात .सायंकाळपर्यंत मुले शाळेत असतात त्यानंतर घरी जातात.

इस्टोनियन सरकारने 2035 मध्ये ' भविष्यवेधी शिक्षण ' कोणते असेल याचा आढावा घेऊन तसे शिक्षण मुलांना देण्यात यावे म्हणजेच भविष्यामध्ये तंत्रज्ञानाने खूप मोठी भरारी घेतलेली असल्यामुळे तंत्रज्ञानाशी संबंधित असणाऱ्या नोकऱ्या, कौशल्य आणि कोडींग या संदर्भातील शिक्षण मुलांना उपलब्ध करून दिले आहे.

मुलांना प्राथमिक वर्गापासुनच डिजिटल शिक्षण दिले जाते. त्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचा उपयोग सर्व विद्यार्थी करताना दिसून येतात .
दरवर्षी रोबोटिक्स स्पर्धा घेतली जाते .दैनंदिन अभ्यासक्रमातही मुले शिकत असताना रोबो ,तांत्रिक तंत्रज्ञानाची डिजिटल माध्यमे ही अभ्यासासाठी वापरताना मुले दिसतात .

त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांचे दप्तराचे ओझे कमी करावे व पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही उद्देशांसाठी डिजिटल मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे लागणारा सर्व शैक्षणिक साहित्य डिजिटल स्वरूपात प्रत्येक मुलांना उपलब्ध करून दिलेला आहे.
 जगातील एकमेव देश आहे ज्याने इंटरनेट सर्व नागरिकांपर्यंत मिळावे असा कायदा केला आहे.

इस्टोनियन शिक्षण पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण हे इस्टोनियन भाषेतच म्हणजेच मातृभाषेत दिले जाते .त्यानंतर इंग्रजी आणि इतर भाषा शिकवल्या जातात .

मुलांचे शिकणे कशी घडेल याकडे इस्टोनियन सरकारचे लक्ष आहे. त्यामध्ये असणाऱ्या संकल्पना या पूर्णपणे समजावून दिल्या जातात यासाठी हे स्वातंत्र्य शिक्षकांना दिलेले आहे .

माध्यमिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगिन विकास करण्यासाठी पूर्णपणे आनंददायी आणि सर्जनशील वातावरण निर्माण केले जाते .
त्यामध्ये विद्यार्थी त्यांना आवडीच्या कृती खेळ प्रयोग हे शिक्षकांच्या मदतीने करतात .यामध्ये त्यांना कोणीही अडवत नाही. या वयातच क्रिटिकल थिंकिंग आणि लॉजिकल थिंकिंग विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात आणि म्हणूनच परीक्षेमध्ये जगात अव्वल इस्टोनियन विद्यार्थी असतात .

माध्यमिक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना छंद शिक्षण देण्यासाठीचे विषय शिकवले जातात. त्यामध्ये संगीत, नृत्य, खेळ ,तंत्रज्ञान ,योगा ,नाट्य ,चित्र, भाषा विषयाचे स्वतंत्र शिक्षक मुलांना ज्ञान देत असतात.

असा जगातील पहिला डिजिटल देश आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम भविष्य निर्माण करणारे शिक्षण देत आहे.


क्रमशः 
सचिन बाजीराव माने
 आरफळ सातारा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या